गुरूजन हिताय, गुरूजन सुखाय!
धर्म या शब्दाला आता अनेक अर्थ प्राप्त झाले असले तरी पूर्वी धर्म म्हणजे नीतीने वागणे, धर्म म्हणजे आपल्याकडून अपेक्षित असलेल्या कर्तव्यांची प्रामाणिक पूर्तता याच अर्थाने हा शब्द प्रचलित होता. क्षत्रिय धर्म, ब्राह्यण धर्म, वैश्य धर्म आदी शब्दप्रयोग जातीवाचक नव्हे तर गुणवाचक होते. समाजाचे संरक्षण करायचा तो क्षत्रिय आणि समाजाचे संरक्षण हा त्याचा क्षत्रिय धर्म, ज्ञानार्जन आणि ज्ञानदान करणारा ब्राह्यण धर्माचे पालन करायचा, तर व्यापारउदीमातून अर्थार्जन करणारा वैश्य धर्माचे पालन करायचा.
[…]