नवीन लेखन...

हृदयाचे वेगवेगळे आजार

हृदयाचे वेगवेगळे आजार हृदयाच्या वेगवेगळ्या आजारांसंबंधी आपण थोडक्यात माहिती पाहू : जन्मजात दोष : काही दुर्दैवी व्यक्तींच्या बाबतीत हे लक्षात आले की त्यांच्या हृदयाच्या रचनेत जन्मतःच दोष असतो. त्यामुळे वेगवेगळ्या व्याधी त्यांना त्रस्त करीत असतात. रचनेसंबंधीच्या दोषातून उद्भवलेल्या या व्याधीवर शल्यक्रिया हा उपचार लाभदायक ठरतो. हृदयाच्या थैलीला अतिसूक्ष्म छिद्र असणे किंवा हृदयाच्या झडपांमध्ये काही दोष असणे […]

वैद्यकीय क्षेत्रातील निर्मळ कथन

डॉ. रवी बापट यांचे नाव सुरेश भट आणि पंढरीनाथ सावंत यांच्या तोंडून वारंवार ऐकले होते. डॉक्टरांची हे दोघेही कायम स्तुतीच करीत. माझा आणि मुंबईचा तसा संबंध नाही आणि मुंबईतल्या डॉक्टरांचा तर त्याहून नाही. त्यामुळे बापट हे कोणी तरी बडे डॉक्टर आणि अधूनमधून साहित्यिकांवर उपचार करतात, असा एक समज माझ्या मनात होता. या पूर्वग्रहासह मी डॉ. बापट यांचे हे आत्मकथन वाचायला घेतले आणि डॉ. बापट यांच्याबद्दल माझे दोन मित्र जे बोलत त्यातले अक्षरही खोटे नव्हते, हे लक्षात आले. […]

रेषालेखकाचे `सहप्रवासी’

`प्रतिभावान रेषालेखक’ असे ज्यांना विजय तेंडुलकरांनी म्हटले ते ज्येष्ठ चित्रकार वसंत सरवटे यांचे `सहप्रवासी’ हे नवे चौरसाकृती पुस्तक. मुखपृष्ठ आणि आतील एक-दोन चित्रे वगळता या पुस्तकात रेषा आहेत, त्या इतर व्यंगचित्रकारांच्या. सरवटे इथे `लेखक’ म्हणून येतात. साठ-एक वर्षांच्या त्यांच्या दीर्घ चित्रप्रवासातील सुहृदांविषयी सरवटे यांनी वेळोवेळी लिहिलेले हे लेख आहेत. […]

काव्यमय व्यक्तिचित्रण

`घरीदारी’ या इंद्रजित भालेरावांच्या व्यक्तिचित्रांच्या संग्रहाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. ही व्यक्तिचित्रे म्हणजे साहित्य क्षेत्रातल्या व्यक्तींचा वेगळा परिचय देणारी आहेत. त्यांच्या गुणांनी व स्वभाववैशिष्ट्यांनी नटलेली ही माणसे जात्याच प्रसिद्ध आहेत. `घरीदारी’ :  लेखक : इंद्रजित भालेराव    

गिरिभ्रमण – एक सशक्त खेळ

श्री. पाळंदे तीस वर्षे गिरिभ्रमण करताहेत. उदंड अनुभवाचा इतरेजनांना फायदा व्हावा, या सद्हेतूने त्यांनी `डोंगरमत्री’चं लेखन केलं. यातील तीसही लेख अभ्यासपूर्ण आणि मार्गदर्शक आहेत. गिरिकंदरामध्ये भटकण्याचा अनुभव घरबसल्या रसिकाला घेता येईल, या दृष्टीने पुस्तकाची जडणघडण डोळ्यात भरते. […]

बंदिस्त नेत्यांचा बंद!

विदर्भाचा कॅलिफोर्निया करण्याचे स्वप्न दाखविणे सोपे आहे; परंतु लोकांना तुमची कुवत माहित असल्याने विदर्भाचा रेगिस्तान होण्यापेक्षा सध्या आहे तेच बरे, असे वाटत असेल, तर त्यात आक्षेपार्ह काही नाही. कारण स्पष्ट आहे. उद्या विदर्भ राज्य झालेच, तर आमदार-खासदार कोण होतील?
[…]

ब्रेकींग न्यूज – ढोणी इडली खातोय!

नुकताच मी टीव्ही लावला होता आणि कुठे काही चांगला कार्यक्रम आहे का ते पाहात होतो. चॅनल बदलता बदलता एका अतिप्रसिध्द चॅनलवर अचानक ब्रेकींग न्यूज झळकली ‘ढोणी इडली खातोय’. म्हटलं बघूया तर हे काय प्रकरण आहे ते. तेवढ्यात स्टुडीओत सादरकर्ती माया अवतरली. मायाः प्रेक्षकहो, आताच आमच्या बंगळूरू येथील वार्ताहराकडून आम्हाला ब्रेकींग न्यूज मिळाली आहे कि साक्षात ढोणी […]

अल्झेमर्सचा आजार आणि आयुर्वेद

२१ सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झेमर्स दिन म्हणून ओळखला जातो. साजरा केला जातो असे म्हणणे चुकीचे ठरेल कारण आनंद देणारे क्षण किंवा विषय साजरे केले जातात. अल्झेमर्स मध्ये खूप यातना दडल्या आहेत. अल्झेमर्स डिसीज म्हणजे काय, तो कोणी शोधून काढला, त्याची लक्षणे काय असतात, काय काळजी घ्यावी लागते, होऊ नये म्हणून काही उपाय करणे शक्य आहे का, आधुनिक वैद्यक शास्त्र ह्या विषयी काय सांगते अल्झेमर्स दिसीज बद्द्ल आयुर्वेदाचा दृष्टिकोन काय आहे ह्या विषयी जाणून घेऊ या. […]

अल्कोहोलऐवजी इथेनॉल!

उसाच्या इथेनॉलचा इंधनात वापर न करून आपण किती मोठी चूक केली, हे सहज लक्षात येऊ शकते. वस्तुस्थिती ही आहे, की स्वातंत्र्यानंतर साखर निर्मिती कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या इथेनॉलचा संपूर्णपणे इंधन म्हणून वापर केला असता, तर आज भारतावर एका पैशाचेही कर्ज राहिले नसते. किमान आतातरी सरकारने उसापासून इथेनॉल आणि धान्यापासून मद्य निर्मितीचे धोरण स्वीकारून विनाकारण खर्च होणाऱ्या विदेशी चलनाची बचत करावी! […]

जागो ये मुर्दों का गांव !

संपूर्ण समाजच बधीर झाला आहे नव्हे जणू मृतप्रायच झाला आहे. येणार्‍या संकटाची जाणीवच नसल्याने त्यावर विचार करून लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने काही उपाय योजणे, त्याचबरोबर मूलभूत गरजा भागविण्याच्या दृष्टीने नियोजनाला सुरूवात करणे याविषयी कोणी बोलतानादेखील दिसत नाही. म्हणूनच कबीराने म्हटल्याप्रमाणे ‘जागो ये मुर्दोंका गांव’ असे म्हणायची वेळ आली आहे. […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..