बजेटची गोष्ट
अलीकडच्या काळात अर्थसंकल्प फेब्रुवारीत सादर करण्यास सुरुवात झाली. मात्र, बजेटचा थोडा मागे जाऊन इतिहास रंजक आहे. भारतीय अर्थसंकल्पाबाबतची ही मोजकी पण संग्रही ठेवावी अशी माहिती.
[…]
अलीकडच्या काळात अर्थसंकल्प फेब्रुवारीत सादर करण्यास सुरुवात झाली. मात्र, बजेटचा थोडा मागे जाऊन इतिहास रंजक आहे. भारतीय अर्थसंकल्पाबाबतची ही मोजकी पण संग्रही ठेवावी अशी माहिती.
[…]
शिवसेनेचा विरोध लक्षात घेता चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी मुंबईतील चित्रपटगृह मालकांच्या संघटनेने चित्रपटाचे प्रदर्शन तो वाद निकाली निघेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला; परंतु शाहरूखची प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी ईरेला पेटलेल्या सरकारने या संघटनेवर दबाब आणून ठरलेल्या दिवशीच चित्रपटाचे प्रदर्शन करण्यास भाग पाडले.
सरकारने एखादा निर्णय अंमलात आणायचे ठरविले तर सरकारला रोखण्याची ताकद कोणत्याही संघटनेत, मग ती संघटना कितीही आक्रमक असो, कोणत्याही राजकीय पक्षात, मग तो कितीही मोठा असो, नसल्याचे नुकतेच शाहरूख प्रकरणावरून सिद्ध झाले आहे. शाहरूख खानच्या एका चित्रपटाच्या प्रदर्शनाला शिवसेनेने विरोध केला.
[…]
नुकतीच एक बातमी वाचली की पुण्याच्या एका प्रसिध्द संस्थेत कायदा शिकणार्या मुलांनी एका मुलाचे रॅगिंग केले त्यामुळे त्या मुलाने आत्महत्या केली. त्या मुलाचे वडील पोलीस खात्यात नोकरी करत होते. त्या मुलाच्या पाठीवर ‘माझे वडील पोलीस आहेत आणि ते गैरमार्गाने पैसे मिळवतात’ अशी पाटी लिहुन त्याला सगळीकडे हिंडवण्यात आले त्यामुळे त्याने आत्महत्या केली. हे सर्व धक्कादायक होते. पण यातून बरेच प्रश्नही निर्माण होतात.
[…]
महाराष्ट्र शासनाने नुकतीच धान्यापासुन मद्य बनविण्याच्या कारखान्यांना परवानगी दिली, यातील बरेचसे कारखाने विदर्भात असुन त्यांची यंत्रसामुग्रीही तयार आहे , फक्त शासनाच्या परवानगीचाच काय तो उशिर होता , असेही समजले. आता यावर बर्याच लोकाना आक्षेप होता . शेतकर्यांच्या आत्महत्या जास्त असणार्या विदर्भात हे कारखाने कशाला ? असे काहींचे म्हणणे होते , तर गरिबी जास्त असताना धान्याचा उपयोग […]
यंदा आमच्या पिंटुला अडीच वर्षे पुर्ण झाली. ‘ आमची मुलगी अठरा वर्ष पुर्ण झाली ‘ असे म्हणताक्षणीच पुढचे वाक्य जसे ‘ आता तिच्यासाठी स्थळ बघायला हवे ‘ आपसुकच येते , तसे पिंटु अडीच वर्षाचा झाला म्हणजे शाळेत घालायच्या वयाचा झाला , असे हल्ली समजतात . मुलाच्या जन्माचे प्लॅनिंग करायच्या आधीच त्याच्या शाळेचे प्लॅनिंग आइवडील करतात , […]
सामना नावाचा अत्यंत ज्वालाग्रही पेपर आहे. त्याचे संपादक संजय राउत हे शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आणि पेपरहुन अधिक ज्वालाग्रही लेखक. मध्यंतरी त्यांनी बिहारी आणि उत्तरप्रदेशी लोकांबद्दल अत्यंत ज्वालाग्रही लेख लिहिला. संसदीय समितिसमोर त्याची चौकशी झाली आणि नेमक्या त्या दिवशी ” संजय राउतांची संसदिय समितिसमोर माफी ” अशी ब्रेकिंग न्युज वाहिन्यांनी फ्लैश केली. त्यावर लगेचच संजय राउत समोर […]
ज्या वाटेने जाऊन आजपर्यंत सगळ्यांचाच कपाळमोक्ष झाला आहे, त्याच वाटेने जाऊन आपल्याला मोक्ष मिळेल, ही आशा केवळ भाबडीच नाही तर प्रचंड अज्ञानमुलक म्हणावी लागेल. परंतु देशाचा गाडा हाकणारे अनेक वरिष्ठ आयएएस, आयपीएस अधिकारी( देशाचा गाडा लोकनियुत्त* सरकार चालविते, हीदेखील मोठ्या प्रमाणात पसरलेली अंधश्रद्धा किंवा अफवा आहे) हे समजून घ्यायलाच तयार नाहीत.
बदल आणि गती हे दोन्ही घटक परस्परपुरक आहेत.
[…]
जगात अन्याय केवळ दुर्बलांवर होत असतो, हा नियमच आहे आणि तो अन्याय दूर करायचा असेल तर इतरांना शिव्याशाप घालून काही फायदा नाही, आपल्यात प्रथम कौशल्य निर्माण करावे लागते, परंतु आम्हा भारतीयांची मानसिकताच नकारात्मक आहे. कष्ट उपसायची आमची तयारी नसते. शिवाजी जन्माला यावा, परंतु तो शेजारच्या घरात, हा आमचा बचावात्मक पवित्रा असतो,आळस हा आमचा स्थायीभाव आहे, आयते मिळेल तेवढे आम्हाला हवे असते आणि कुणी ते देत नसेल तर त्याच्या नावाने शंख करण्यास आम्ही सज्ज असतो.
[…]
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात निष्टी हे गाव आहे. या गावातील मासेमारी करणा-या ११५ कुटुंबांनी रेशिम विभागाच्या ६०० हेक्टर जमिनीवर रेशिम व्यवसाय सुरु केला आहे. तेथील ऐन व अर्जुन झाडावर कोष तयार करणार्या अळीचे पालन करुन रेशिम शेती व्यवसायात त्यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे.
[…]
औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिध्द अजिंठा-वेरुळ लेण्यामुळे जगभरातील पर्यटक येथे मोठय़ा संख्येने भेट देतात. याचबरोबर म्हैसमाळ हेही एक थंड हवेचे ठिकाण विकसित होऊन प्रसिध्दीस आल्याने तेथेही मोठय़ा प्रमाणात पर्यटक येतात. प्रति म्हैसमाळ म्हणून सारोळा वनपर्यटन स्थळ आकारास येत आहे.
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions