करायचे ते करून झाले अता
प्रदीप निफाडकरांची गझल
[…]
प्रदीप निफाडकरांची गझल
[…]
प्रदीप निफाडकरांची गझल
[…]
कोणताही समाज हा राष्ट्राभिमानी होण्यासाठी तो प्रथम स्वभाषाभिमानी असावा लागतो. स्वभाषाभिमानाविषयी महाराष्ट्राची, तसेच राजभाषा मराठीची स्थिती काय आहे, हे सर्व जण जाणतात. बहुतांश मराठी जनांकडून दहा शब्दांच्या एका वाक्यात इंग्रजी, अरबी, फारसी आदी परकीय भाषांतील एक-दोन शब्द सहजपणे वापरले जातात. अन्य भाषेतील शब्दांची सरमिसळ करून मराठीत बोलणार्या किंवा ते बोलणे ऐकणार्या मराठी माणसाला त्याची खंतही वाटत नाही. राजकीय लाभासाठी मराठीची ढाल पुढे करणारे पुष्कळ आहेत, मराठीसाठी वर्षातून एकदा होणार्या साहित्य संमेलनात गळा काढणारेही उदंड आहेत; पण खरोखर मराठी जिवंत ठेवण्यासाठी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा स्तर (दर्जा) देण्यासाठी झटणारे मराठीप्रेमी अल्प आहेत. सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. जयंत आठवले हे या अल्प मराठीप्रेमींपैकीच एक आहेत. प.पू. डॉ. आठवले यांनी मराठी भाषेच्या रक्षणासाठी `भाषाशुद्धीचे व्रत’ या एका मार्गदर्शक ग्रंथाची निर्मिती करून मराठी भाषेच्या रक्षणाची चळवळ अत्युच्च वैचारिक स्तरावर पोहोचवली आहे. प.पू. डॉ. आठवले हे अध्यात्मक्षेत्रातील सर्वश्रुत नाव. अध्यात्माशी निगडित १६० हून अधिक ग्रंथांचे लिखाण त्यांनी केले आहे. थोर विभूतींनी निर्मिलेले वाङ््मय सर्वच दृष्टीकोनांतून मौलिक असते. म्हणूनच डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या `भाषाशुद्धीचे व्रत’ या ग्रंथाच्या माध्यमातून `मराठी भाषाशुद्धीच्या चळवळीला अध्यात्माचा स्पर्श झाला’, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
[…]
प्रत्येक धर्म आणि धर्माची शिकवण पवित्र असते. धर्म हा व्यक्तिगत असतो. त्यामागे त्या व्यक्तीची श्रद्धा आणि विश्वास असतो. समधर्मीय व्यक्तींना एकत्रित आणण्याचा तो एक धागा असतो. धर्म मानणे, धर्माचे संस्कार मानणे, ती शिकवण व्यवहारात पाळणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. ही एक खोलवर जपलेली श्रद्धा आहे.
[…]
आज मुंबई अस्वस्थ आहे. काय करावे हे तिला सुचत नाही. कसे जगावे हे उमजत नाही. कोणाला सांगावी तिची व्यथा? कोणाकडे मांडावी तिची कथा? जगासाठी ती या देशाची आर्थिक राजधानी आहे. एक महानगरी आहे. पण काय आहे आता तिच्याकडे?
[…]
आम्ही वेगळे झाल्यावर उपाशी राहू अथवा मरुत याच्याशी तुम्हाला काय देणे घेणे . नाही तरी तुमच्या राज्यात राहून आम्हाला आत्महत्या कराव्याच लागतात ना? मग वेगळे होवून परिस्थिती शी टक्कर देत आम्ही जगण्यास शिकुत, तुम्ही फेकलेल्या अनुदानाच्या तुकड्यान ची वाट पहावी लागणार नाही. एक मात्र खरे या परिस्थितीत आम्ही आत्महत्या मात्र करणार नाही.
105 बलिदाने आपणास 50 वर्षा नंतर ही भावनिक black making करता आठवतात पण 10000 शेतकऱ्यांच्या तुमच्या राजकारण्यांनी केलेल्या हत्त्या दिसत नाही
[…]
या आदिवासींकडून दिवसभर ढोर मेहनत करून घेऊन
मजूरी म्हणून शेरभर मीठ त्यांच्या झोळीत टाकणाऱ्या, आदिवासींच्या बायका आपलीच संपत्ती मानणाऱ्या, त्यांना जगण्याच्या साध्या प्राथमिक सुविधांपासून हेतूपूर्वक वंचित ठेवणाऱ्या सुशिक्षित समाजाला आज याच आदिवासींच्या मुलांनी बंदूका हाती घेतल्यावर घाम फुटत आहे. त्यांच्या बंदुकीतून गोळ्या नव्हे तुमची शेकडो वर्षांची पापं बाहेर पडत आहेत. तुम्हाला हे सहन करावेच लागेल.
[…]
आधुनिकतेच्या नावाखाली नपुंसक बियाणे या देशाच्या
माथी मारली जात आहेत आणि इथल्या शेतकऱ्याला कायमचे दरिद्री, परावलंबी ठेवण्याचे षडयंत्र अंमलात आणले जात आहे. दुर्दैवाने या षडयंत्राला सरकारचादेखील प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष पाठिंबा आहे. हे षडयंत्र केवळ शेतीपुरते मर्यादित नाही.
[…]
अजिंठा लेण्यांच्या आतील हा सुंदर फोटो…. — संतोष पाटील
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions