नवीन लेखन...

छोटीसी बात…. अगम्य ‘शिक्षित’ पालक..!

हिंदीत ‘शिक्षा’ चा अर्थ शिक्षण.

आणि शिक्षा शब्दाचा मराठी अर्थ काय? हे सांगण्याची अजिबात गरज नाही.

कारण अनेक पालकांनी त्यांच्या लहानपणी ‘शिक्षा’ या शब्दाच्या अनेक अर्थछटा अनुभवल्या आहेत,चाखल्या आहेत,गिळल्या आहेत, अंगावर मिरवल्या आहेत आणि कपड्याखाली लपवल्या पण आहेत.
[…]

कुत्र्यांना धरावे की मारावे?

 रोगग्रस्त, पिसाळलेले आणि आक्रमक कुत्र्यांना तर नक्कीच ठार मारले पाहिजे. श्‍वान प्रेमिंनी कुत्र्यांवर प्रेम करण्यासोबत त्यांच्या पालनाचीही जबाबदारी घ्यावी. त्यांना जर कुत्र्यांवर एवढंच प्रेम करायच असेल तर त्याची किंमतही मोजायला तयार रहायला हव. मनुष्य हा प्रथम माणसांसाठी आहे. आपल्या देशात अनेक अनाथ मुले आहेत त्यांच्याबद्दल ही मंडळी सहानुभुती का दाखवित नाही? […]

नातं- स्त्रीचं स्त्रीशी

कॉलेजात प्रवेश केल्यावर जाणवणार्‍या अनामिक हुरहुरीसारखी एक अनामिक हुरहूर कॉलेज संपत येऊ लागल्यावरदेखील जाणवू लागते. ‘पुढे काय?‘ याविषयी काहींनी ठरवलेले असते, तर काहींचे काही निश्चित मनाजोगते ठरतच नसते. अशा भांबावलेल्या मनःस्थितीत आपण व आपली खास मैत्रिण एकमेकींना यापूर्वी जशी साथ दिली तशीच यापुढेही प्रत्येक क्षणाला देऊ, असे मनोमन ठरवित असतो. अन् एक दिवस खरोखरच कॉलेज संपते… अन् सुरू होते कॉलेज कॅम्पसपेक्षा मोठ्ठ्या कॅम्पसमधली अस्तित्त्वाची लढाई!
[…]

न्यायदानाची बिकट वाट

जेव्हा लिखित कायदेच अस्तित्वात नव्हते आणि न्यायाची सर्वसाधारण तत्त्वे फत्त* लक्षात घेऊन न्याय करावयाचा होता, तेव्हा एका अर्थाने न्यायाधीशाचे काम सोपे तर दुसऱ्या अर्थाने अवघड होते. सोपे यासाठी की त्याच्या न्यायबुद्धीला भरपूर स्वातंत्र्य होते. संबंधितांचे म्हणणे ऐकून घ्यावे, पक्षकारांच्या हक्कांचा आजवरच्या परंपराच्या आधारांवर निर्णय करावा, जेथे धर्माचा संबंध असेल तेथे त्या धर्मातील ढोबळ नियमांची माहिती करून […]

शांततेचा लंबक इकडून तिकड

थोडक्यात- मानवाच्या प्रत्येक जखमेवर, दु:खावर काळच मात करू शकतो. त्यावर तोच उपाय आहे. काळाच्या ओघात हा आघातही दूर होईल. आता मी जे या खेपेला सांगितले, त्याचे तूही रोज मनन करशील. हे दोस्त, उदास… निराश नको होऊस! […]

पुरूषांना नको का माहेर?

असेल तर ‘माहेर’ या शब्दासाठी नवा काही पर्याय शोधून काढावा. आणि त्या माहेरी चार दिवस सुखानं राहावं. भिरकावून द्यावं जबाबदारीचं जड ओझं, तोडून टाकावं मौनाचं कुलूप आणि गाव्या मुत्त* चारोळ्या. आई, वडील, बहीण, भाऊ सर्वांचे हात हाती घेऊन द्यावा घ्यावा उबदार दिलासा. […]

भाव अंतरी उमलत होते…

दत्ता डावजेकर यांच्या संगीतसाजाने नटलेलं हे गीत डोळ्यांत पाणी उभे करते. किंवा

‘दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती

परि जयाच्या दहन भूमीवर नाही चिरा, नाही पणती…‘

त्याचप्रमाणे मनात राष्ट्रभक्तीची, मातृभूमीची, मायबोलीची ज्वाला तेजाने तळपत ठेवणारी गीते वेगळेच स्फुरण आणतात. अगदी वाचता क्षणी जीव

ओवाळून टाकायचीही तयारी व्हावी, इतकं वजन त्या गाण्यांतून असे.
[…]

एकेरी पालकत्वाचे आव्हान

येणार्‍या काळात हा एकेरी पर्याय स्वीकारणार्‍या स्त्रियांची संख्या उत्तरोत्तर वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे एकेरी मातृत्व अनेकांना कोलमडत चाललेल्या कुटुंबसंस्थेचा परिपाक वाटू शकेल. पण याचे उत्तर इतके साधे नाही. या कुटुंबसंस्थेच्या मुळाशी ज्या पुरुषसत्ताक प्रवृत्तीची पेरणी समाजाने केली, त्याची ही फळे असतील का? […]

1 4 5 6 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..