MENU
नवीन लेखन...

बुकर पारितोषिक विजेते हॉवर्ड जेकबसन

आपल्याकडे ज्यूंचे मन आहे, आपल्याकडे ज्यूंची बुद्धिमत्ता आहे आणि आपल्याकडे त्यांची विनोदाची शैलीही आहे, असे स्वतःचे वर्णन करणारे हॉवर्ड जेकबसन हे २०१०चे बुकर पारितोषिकाचे विजेते आहेत. यापूर्वी दोनवेळा ते या पारितोषिकाच्या जवळ आले होते, पण त्यांचे पुस्तक निवडले गेले नाही. ‘द फिंक्लर क्वेश्चन’ या कादंबरीला २०१०चे बुकर पारितोषिक जाहीर करण्यात आले. त्यांचे पारितोषिक कदाचित हुकले असते, […]

मिठाई

त्यानी मुठ उघडुन दाखवली, हातातले ५० रु. आजीकडे दिले व शेठनी “जा मी तुला माफ़ केलेय. हे पैसे घे आणि घरी जा या पैशाची मिठाई खा.” अस सांगीतल्याच सांगीतल. आजीला सुजलेला सख्याचा गाल दिसत होता, उपाशी दुसरी दोन नातवंड दिसत होती. आज घरात खायला काहीच नव्हत. आणखीन दोन दिवस उपाशी राहाव लागणार होत. तीनी ते पैसे देवासमोर ठेवले. सख्याला जवळ घेतल त्याच्या दुखर्‍या गालावरुन हळुवार हात फ़िरवत म्हणाली “सख्या, अरे ते मोठे लोक आहेत. आपण फ़ार लहान आहोत. शेठेनी मारल तर काय होतय ?तेच आपले अन्नदाते आहेत.” […]

अभिवादन गुरूंना – (गुरूपौर्णिमा विशेष)

‘गुरुबिन मोरा कौन अधारो’ असे एक वचन आहे. गुरू हाच जीवनाचा आधार असतो हे यातून प्रतित होते. आपण कोणत्याही क्षेत्रात असलो तरी गुरूची आवश्यकता असते. शिष्याच्या कल्याणाप्रती आयुष्य वेचणार्या, त्याला खर्या अर्थाने घडवणार्या गुरूंच्या ऋणातून मुक्त होणं कठीण. पण किमान कृतज्ञता तरी व्यक्त करायला हवी. त्यासाठी उत्तम मुहूर्त असतो गुरूपोर्णिमेचा. ही पोर्णिमा नवी दिशा, नवे संकेत, कृतज्ञता देऊन जाते.
[…]

“बाभळीचे काटे” अचानक चर्चेत

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या घुसखोरीमुळे बाभळी धरणाच्या वादाला पुन्हा तोंड फुटले. कोणतेही कारण नसताना हा प्रश्न उकरून काढणे चुकीचे आहे. पण, केवळ राजकीय स्वार्थापोटी नायडूंनी हा नसता उद्योग केला. या प्रश्नाबाबत केंद्र आणि महाराष्ट्र सरकार कुचकामी असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. आता या प्रश्नावर राज्यातील जनता उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरल्यास आश्चर्य वाटायला नको.
[…]

गोवा –

गोव्याला आमच्या श्री. शांतादुर्गा देवीचं देऊळ आहे. श्री. शांतादुर्गादेवी ही आमची कुलदेवता. कोकणातल्या गावातला गणपती उत्सव साजरा करुन मुंबईला परतण्याआधी गोव्याला जाऊन देवीचं दर्शन घेणं हा रिवाज आम्ही अनेक वर्षे पाळतो आहोत. […]

वाट मृत्युची /पत्ते खेळणाऱ्या पेंशनर म्हात्यारांच्या डोळ्यांत मला जे दिसल

सुट्टीच्या दिवसांत जनकपुरितल्य़ा डिस्ट्रीक्ट पार्क मध्ये फिरायला जात असे – ताश खेळणाऱ्या पेंशनर म्हात्यारांच्या डोळ्यांत मला जे दिसल….मरण येत नाही म्हणून जिवंत …
[…]

९/९ विश्वास निवास

९/९, विश्वास निवास, परळ, मुंबई – १२ हा आमचा परळच्या घराचा पत्ता. आयुष्यातील पंचवीस वर्षे मी परळला काढली. जन्मल्यापासून म्हणजेच १९४९ सालापासून ते १९७४ पर्यंत. थोडक्यात माझं सर्व बालपण परळला गेलं. बालपण आणि तरुणपणातील काही सुरुवातीची वर्ष. आज साठीच्या दाराशी घुटमळत असतानाही मनात बालपणीच्या आठवणी टवटवीत आहेत. परळ ओलांडून पुढे जाताना या सर्व आठवणी जागृत होतात. परळचा रस्तान् रस्ता, तिथल्या इमारती, तिथली गजबज सारं काही पुन्हा आठवतं. क्षणार्धात काळ तीसएक वर्ष मागे झेपावतो. मी पुन्हा परळचा होऊन जातो आणि परळ माझं. […]

माझी ओमानची शैक्षणिक भेट

ओमान देशाला आखाती राष्ट्रसमूहाचे प्रवेशद्वार म्हटले आहे तर वावगे ठरू नये. तीन समुद्रांची किनार व निसर्गाचे लेणे लाभलेला हा देश पर्यटकांना आकर्षित तर करतोच परंतु गेल्या अवघ्या चार दशकांत व्यापार उदिमात झपाट्याने अग्रेसर बनून सर्वांगीण प्रगतीची कास धरणारे राष्ट्र म्हणून हा देश मला विशेष भावला. प्रस्तुत लेखात मस्कत-सूर आदी ओमान देशातील ठिकाणी केलेल्या शैक्षणिक दौर्‍यातील अनुभव लिहिलेले आहेत.
[…]

“पहिला” दिवस शिक्षकाचा !

शैक्षणिक क्षेत्राचा आधारस्तंभ म्हणजे शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंध. हे नातेसंबंध कसे निर्माण होतात, किती बहरतात, वाढतात, का खुरटेच राहतात, यावर त्या दोघांचे आणि शाळेचेही भवितव्य अवलंबून असते. हे नातेसंबंध रुजतात शिक्षक व विद्यार्थी यांच्या पहिल्या भेटीतच. म्हणूनच शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळेच्या पहिल्याच दिवशी वर्गावर जाताना प्रत्येक शिक्षकाने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आज ते जे बोलतील, जसे वागतील त्याचेच पडसाद वर्गात वर्षभर उमटणार आहेत. यामुळे पहिल्याच भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांची मने जाणून घेण्याचा, जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यास हा प्रयत्न नक्की यशस्वी होऊ शकतो. […]

1 2 3 4 5 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..