ऑस्ट्रो-आफ्रिकी केप्लर आणि कॅरिबिअन-भारतीय रॉबिन (१४ सप्टेंबर)
कसोटी इतिहासात आजवर फक्त एका खेळाडूने दोन वेगवेगळ्या देशांकडून शतके काढण्याचा आणि १,००० धावा जमविण्याचा पराक्रम केला आहे. १४ सप्टेंबर १९५७ रोजी ब्लोमफौंटनमध्ये केप्लर वेसल्सचा जन्म झाला. वेस्ट इंडिजमध्ये जन्मून भारतातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या रामनारायण सिंग-पुत्राचा जन्म १४ सप्टेंबर १९६३ रोजी त्रिनिदाद बेटांवर झाला. रबींद्र हे त्याचे अधिकृत वापरासाठीचे नाव पण ‘रॉबिन सिंग’ या नावानेच तो सुपरिचित आहे.
[…]