सलग-सहा-शतके आणि वेस हॉल
लॉर्ड्सवर यॉर्कशायरविरुद्ध शेष इंग्लंड संघाकडून खेळताना चार्ल्स फ्राय यांनी या दिवशी १०५ धावांची ‘सुंदर खेळी’ (विज्डेन आल्मनॅक) केली. ओळीने सहा प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये शतके काढण्याचा त्यांचा हा विक्रम अद्याप मोडला गेलेला नाही. १२ सप्टेंबर १९३७ रोजी भयावह कॅरिबियन द्रुतगती गोलंदाजांच्या तांड्यातील आणखी एका सरदाराचा जन्म झाला. वेस्ली विन्फील्ड हॉल त्याचं नाव. त्याच्या काळपट गळ्यातील सोन्याची साखळी तो धावू लागताच अस्ताव्यस्तपणे हले
[…]