मुष्टिवीर जॉन डग्लस आणि सर्वात ‘लांब’ प्रथमश्रेणी सामना
…आपला नेहमीचा गोलंदाज सिडनी बार्न्सला सोडून जॉनीने त्या कसोटीत गोलंदाजीची सुरुवात केली होती. सिडही कच्च्या गुरुचा चेला नव्हता. कप्तानाला भर मैदानावर तो कचाकचा बोलला आणि गोलंदाजी करण्यासाठी जॉनीने पुन्हा चेंडू हातात घेतला नाही. सिडच्या धैर्याचे केवळ कौतुकच केले जाऊ शकेल – 1908च्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (लंडन) जॉनीने अंतिम फेरीत स्नोवी बेकर या ऑस्ट्रेलियाई खेळाडूला पराभूत करून मध्यम वजनगटातील मुष्टियुद्धाचे विजेतेपद मिळविले होते !
[…]