कापडी पिशव्या बनविणारा अनिरुध्द बचत गट
आज अनेक कारणांमुळे पृथ्वी वरील पर्यावरणाचा तोल ढासळू लागला आहे. त्याचे दुष्परिणाम सर्वच स्तरांवर होत आहे. या दृष्टीकोनातून जगात सर्वत्र प्रयत्न सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड व पुणे शहरात शासनाने प्लास्टिक वर बंदी घातली आहे. या बंदी आदेशाचा लाभ अनिरुध्द बचत गटाच्या महिलांनी घेतला. बाजारात प्लॉस्टिक पिशव्यावर बंदी असल्याने ग्राहकांना कापडी पिशव्यांशिवाय दुसरा पर्याय नाही. हा दृष्य विचार करुन या महिला काम करीत आहेत. […]