भारतीय संस्कृतीत कुटुंबसंस्थेस महत्त्वपूर्ण स्थान आहे. परंतु या सध्याच्या परिस्थितीत विभक्त कुटुंब पध्दत उदयाला येताना दिसते. सर्वात मोठा प्रश्न आहे तो वृध्दांचा (ज्येष्ठ नागरिकांचा). मुलांचा सांभाळ करुन त्यांच्यावर चांगले संस्कार केल्यानंतर करिअरच्या मागे धावणार्या मुलांनी पालकांकडे पाठ फिरविली. अशा अनेक ज्येष्ठ नागरिकांसमोर प्रश्न आहे तो आधाराचा. मुलं वृध्दापकाळातील आधाराची काठी असतात, असे सर्वसामान्यपणे म्हटले जाते, परंतु याचा विसर पडू लागला आहे. आता यावर उपाय म्हणून शासनानेच लक्ष घालून ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थासाठी व कल्याणासाठी नियम २०१० तयार केला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात अडचणी येणार नाहीत, त्यांना जगण्यासाठी त्रास होणार नाही यांची काळजी घेतली आहे.
[…]