कांबळेंचे भाग्यशाली अध्यक्षपद
ठाणे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या साहित्यिक उत्तम कांबळे यांची ‘वाट तुडवताना’ आणि ‘आई समजूनघेताना’ हीआत्मचरित्रात्मक पुस्तके आणि इतर साहित्य सुपरिचित आहे. त्यांनी मराठी वाचन चळवळ गावोगावी पोचवणे, सामान्य माणसाला वाचनसंपन्न करणे, मांडवाबाहेरच्या पुरोगामी मंडळींना मुख्य मंडपात विचारमंथन करण्याची संधी देणे वगैरे उपक्रम योजले आहेत. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे वय यौवनाकडे झुकवणार्या कांबळेंसाठी हे अध्यक्षपद भाग्यशाली ठरावे. […]