October 2010
समृद्धीचे वरदान
प्रभात झाली, सुर्य उगवला वंदू रविराजाला मुखमार्जम अन् स्नान करोनी लागा अभ्यासाला सशक्त होण्या दूध प्यावे चौरस आहार करावा नियमित व्यायाम करत असावे मंत्र हा आचरावा माता-पिता अन् गुरुजन अपुले हिनकर्ते हे जाणावे सेवाभावे नम्रतेने इतरांचे मन राखावे नियमा पालन करील त्याचे तन-मन होईल विशाल समृद्धीचे वरदान तयाला ईश्वर ठेवील खुशाल — सौ. सुधा नांदेडकर
ऑक्टोबर २५ – शहारविणारे शतक आणि झहीद-जावेद
१९८२ : सर्वात कमी चेंडूंमध्ये झळकाविले गेलेले प्रथमश्रेणीतील निर्विवाद (आणि सर्वमान्य) शतक. व्हिक्टोरियाविरुद्ध अडलेडमध्ये डेविड हूक्सने अवघ्या ३४ चेंडूंमध्ये शतक काढले. […]
ऑक्टोबर २४ – रजाचा छोटासा विक्रम आणि दोन अंकी बंधू-पुराण
१९९६ : सर्वात छोट्या कसोटीवीराचे पदार्पण. नाकाखाली वारीक सुतासारखी मिसरूडे दिसत असणार्या हसन रजाचे वय १४ वर्षे २२७ दिवस इतके होते. […]
ऑक्टोबर २३ – बेरकी जार्डिन आणि डॉक्टर गेले…
१९०० : शरीरवेधी गोलंदाजीच्या आविष्कारकर्त्याचा जन्म. १९१५ : क्रिकेटमधील सर्वात विख्यात दाढीचे मालक असलेल्या डॉक्टर विल्यम गिल्बर्ट ग्रेस यांचे वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. […]
ऑक्टोबर २२ – मॅकोची मजा आणि ब्रेशॉचे ‘दस्कट’
१९८३ : मॅकोच्या आयुष्यातील संस्मरणीय दिवस. कानपूरमध्ये भारताविरुद्ध माल्कम मार्शलने ९२ धावा काढून सर्वोच्च कामगिरी तर नोंदविलीच पण पहिल्याच हप्त्यात गोलंदाजी केली ८-५-९-४.
१९६७ : इअन ब्रेशॉ (ब्रॅडशॉ नाही) या पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाने ‘दस्कटाचा’ मान मिळविला- व्हिक्टोरियाचे दहाच्या दहा गडी बाद केले. […]
ऑक्टोबर २१ – गोइंग, गोइंग, गॉन आणि उमदा उल्येट
१९४० : जेफ्री बॉयकॉटचा जन्म. त्याची प्रतिभा आणि तंत्र याबाबत कुठेही दुमत नाही पण त्याच्या अप्पलपोटेपणामुळे क्रिकेटविश्वात त्याच्याबद्दल विविध मते आढळतात.
१८५१ : यॉर्कशायरच्या जॉर्ज उल्येट या उमद्या अष्टपैलू खेळाडूचा जन्म. त्याची २४ ही त्या काळातील सरासरी तो काळ पाहता आजमितीच्या ४८ पेक्षा चांगली आहे. […]
ऑक्टोबर २० – सीमाप्रेमी सरदार आणि नजफगढचा नवाब
१९६३ : कालपरवा द ग्रेट इंडीयन लाफ्टर चॅलेंजमध्ये विनोद पूर्ण होण्याआधीच हसणार्या नवजोतसिंग सिद्धूचा जन्म. त्याच्या उमेदीच्या काळात सिद्धूने जगभरातील फिरकीपटूंची झोप उडविली होती.
१९७८ : भारताच्या पहिल्या कसोटी त्रिशतकवीराचा जन्म. कारकिर्दीच्या सुरुवातीसच ज्याची सचिन तेंडुलकरशी तुलना केली गेली तो वीरेंद्र सेहवाग दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पणातच शतक ठोकून प्रकाशात आला. […]
ऑक्टोबर १९ – भुकेला पॉनी आणि मार्कची मृदुता
१९०० : धावांची खूप जास्त भूक असणार्या बिल पॉन्सफोर्डचा जन्म.१९९८ : पेशावरमधील सामना अनिर्णित राहिल्याने १-० अशी आघाडी कायम राखत १९६०नंतर प्रथमच पाकिस्तानात कसोटी मालिका जिंकण्याच्या आशा कांगारूंनी जिवंत ठेवल्या. […]
पृथ्वीचे प्रेमगीत
पृथ्वीचे प्रेमगीत ही कुसुमाग्रजांची एक निसर्गवत्सल, स्थल-कालातीत आणि नितांतसुंदर रचना आहे. ही कविता अन्यभाषिकांपर्यंत पोहचविण्याचा हा प्रयत्न. या हिंदी भाषांतराचे ‘कवितापण’ वाढविण्याच्या दृष्टीने बदल सुचवावेत अशी प्रार्थना. […]