नवीन लेखन...

प्रिय घटना

यंदा देशात सलोख्याचं वातावरण निर्माण झालय ही खुप समाधानाची व आनंदाची गोष्ट आहे कारण नजीकच्या काळातील काही प्रिय घटना या परिस्थितीला साजेशा आहेत अर्थात छोटा – मोठा अपवाद असेलही पण त्यामुळे या आनंदावर विर्जण पडावं एवढही काही मोठं अघटित घडलं नाही, नाही म्हणायला नको ते ऐकायला लावणारे व कल्पनाही करवत नाहीत.
[…]

विजयोत्सवाची मुहुर्तमेढ

दसर्‍याच्या निमित्ताने समाजातील विविध घटक एकत्र येतात. विचारांचं आदान-प्रदान होतं. परस्परांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचे संस्कार यातून घडतात. आशा, आनंद आणि उत्सुकता यांचा संगम हे दसर्‍याचं वैशिष्ट्य. दसर्‍याच्या मुहुर्तावर पांडव, प्रभू श्रीराम, मराठे-पेशवेशाहीने विजयाची मुहुर्तमेढ रोवली. त्यामुळेच या सणाला विजयोत्सव म्हटलं जातं. नातेबंधांमध्ये जल्लोष निर्माण करणार्‍या या सणाविषयी…
[…]

क्रीडाविश्वाचे ऐतिहासिक सीमोल्लंघन !

लगान, चक दे इंडिया यासारख्या जोशभर्‍या चित्रपटातील रोमांच प्रत्यक्षात यावेत आणि अंगावर शहारे उमटावेत असंच काहीसं दिल्लीमध्ये राष्ट्रकुल स्पर्धांच्या निमित्ताने अनुभवायला मिळालं. नकारात्मक प्रचाराकडून अभूतपर्व ऐतिहासिक यशाच्या दिशेने वाटचाल करणारी या स्पर्धेची यशोगाथा एखाद्या चित्रपटाला साजेशी होती. या स्पर्धेमुळे भारताने क्रीडा महासत्ता बनण्याच्या दिशेने कूच केली असल्याचे जगाला पहायला मिळाले.
[…]

कर(नाटकी) राजकारणाचा नवा अध्याय

कर्नाटकमध्ये सध्या राजकारण्यांची ‘कामे कमी आणि नाटके जास्त’ अशी परिस्थिती झाली आहे. तिथे नव्या नाटकाचा प्रारंभ झाला असून एकूण राजकीय परिस्थिती कूस पालटत आहे. या राज्यातील राजकीय ध्रुवीकरणाचा हा महत्त्वाचा टप्पा असला तरी तिथली जनता राजकारण्यांना विटून गेली आहे. येथील राजकारणात गेल्या आठ-दहा वर्षांमध्ये घडलेले बदल तपासून पाहिले तर नाट्यमय राजकारणाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे दिसून येते.
[…]

न्यायालयाची प्रत्ययकारी तळमळ

सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच सरकारी अधिकार्‍यांच्या भ्रष्टाचारी वृत्तीवर ताशेरे ओढून सामान्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली. बांधकाम, शिक्षण, पाटबंधारे आणि महसूल या महत्त्वाच्या खात्यांमध्ये आढळणार्‍या भ्रष्टाचारामागचे मूळ कारण म्हणजे किचकट कायदे. सरकारी कामांमध्ये होणार्‍या दिरंगाईबाबत ठोस कायदे तयार झाले तर भ्रष्टाचाराला आळा बसू शकतो. त्या दृष्टीने पावले उचलल्याशिवाय तरणोपाय नाही.
[…]

1 6 7 8 9 10 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..