कांदा साठवा, भाव मिळवा
अलीकडे चातुर्मासातही कांदे खाणार्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे थंडीच्या दिवसात कांद्याला अधिक मागणी प्राप्त होते तसेच त्याला दरही चांगला मिळतो. पण या हंगामात किंवा अन्य वेळी बाजारात अनुकूल परिस्थिती असताना कांदा बाजारात आणायचा तर त्याची योग्य साठवणूक व्हायला हवी. या बाबीकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे खराब झालेला कांदा अक्षरश: रस्त्यावर फेकून देण्याची वेळ उत्पादकांवर येते.
[…]