मुक्ततेनंतरही खडतर लढा सुरू
म्यानमारमधील लोकशाही लढ्याच्या नेत्या आँगसान स्यू की यांची बंदीवासातून मुक्तता झाली असली तरी त्यांचा जुलमी राजवटीविरुध्दचा लढा पुढेही सुरूच राहणार आहे. किंबहुना बांगलादेशासारखे विराट आंदोलन उभे करुन तो यशस्वी करावा लागणार आहे. या लढ्याला बळ प्राप्त होण्यासाठी म्यानमारवर जागतिक लोकशक्तीचे दडपणही आणावे लागेल. या कामी भारताने पुढाकार घ्यावा अशी अनेकांची इच्छा आहे.
[…]