नव्या कायद्याचा महिलांना दिलासा
कामाच्या ठिकाणी महिलांना अनेकदा केवळ स्त्री असल्यामुळे वाईट वागणुकीला तोंड द्यावे लागते. सरकारने अशा घटनांबद्दल कडक शिक्षेची तरतूद करणारा कायदा केला आहे. मंत्रिमंडळाने या कायद्याचे विधेयक मंजूर केले असून ते संसदेत लवकरच मंजूर केले जाईल. या कायद्यामुळे महिलांसंदर्भातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकेल. अर्थात, त्यातील काही त्रुटीही लक्षात घ्यायला हव्यात.
[…]