बबुआ, जनता भारी है !
काहीही न करता 15 वर्षे निवडून येण्याचा अनुभव लालूंच्या गाठीशी होता पण आपल्याला या जनतेनं कसं फसवलं याचं आश्चर्य त्यांच्या मनात मावेनासं झालं होतं. त्यातल्या त्यात आता घरी कसं जायचं याची चिंता त्यांना सतावत होती. कारण राबडीदेवींना दोन ठिकाणी उभं करून एकाही ठिकाणाहून निवडून आणू न शकल्याने घरात स्वागत कसं होतंय याची त्यांना काळजी लागून राहिली होती !
[…]