नोव्हेंबर १५ : सचिनचे पदार्पण आणि ऐतिहासिक डर्बन कसोटी
आपल्या सातत्यपूर्ण कारकिर्दीने क्रिकेटच्या इतिहासालाच एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवणार्या सचिन तेंडुलकरच्या कसोटी कारकिर्दीचा आरंभ या दिवशी झाला. सचिन तेंडुलकरच्या पदार्पणावर बरोब्बर तीन वर्षांनी (१९९२) रमाकांत आचरेकर सरांच्या आणखी एका चेल्याने कसोटी पदार्पण साजरे केले आणि अगदी दणक्यात शतक ठोकून. १५ नोव्हेंबर १९९२ रोजी डर्बनमधील किंग्जमीडवर प्रवीण आमरेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६४ धावा काढल्या. आदल्या दिवशीचा खेळ संपताना तो ३९ धावांवर नाबाद होता.
[…]