मेकअप करुन कॉलेजला ताई निघेल
तेव्हा मात्र जरुर ये सल्ला माझा ऐकुन घे वार्याला बरोबर घेऊनच ये फजिती होईल ताईची तुला संधी मिळेल भिजवायची वार्याने ओढणी उडत जाईल धावपळ ताईची नक्की होईल फटाफट शिंका ताई देईल सरासर फोटो मी काढीन वायदा आपला पक्का यायच नक्की बरं का. — सौ. सुधा नांदेडकर