नवीन लेखन...

ऑक्टोबर १४ रशीद लतीफ आणि ‘गंभीर’ गौतम

१४ ऑक्टोबर १९६८ रोजी रशिद लतिफ या पाकिस्तानी कर्णधाराचा आणि यष्टीरक्षकाचा जन्म झाला. क्रिकेटविश्वाला ढवळून काढणार्‍या निकालनिश्चिती प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर असे प्रकार मान्य करणार्‍या थोडक्या खेळाडूंमध्ये रशीद लतीफ होता. […]

ऑक्टोबर १३ सर्पट्याचा शोधक आणि विविअन रिचर्ड्सचा तडाखा

’सर्पट्या’ चेंडूच्या (गुगली) शोधाचे श्रेय ज्याला दिले जाते त्या बर्नार्ड जेम्स टिन्डल बोसांकेचा जन्म १३ ऑक्टोबर १८७७ रोजी मिडलसेक्समध्ये झाला (इंग्लंड). […]

महिलांचा सन्मान पुराणातच ?

समाजात स्त्रियांचा सन्मान केला जावा असे कितीही सांगितले जात असले तरीही आपल्या देशात अजून तरी या बाबतीत मध्ययुगीन मानसिकताच दिसत आहे. परवा एकाच दिवशी देशातील विविध न्यायालयांनी बलात्कार आणि खुनाच्या तीन बहुचर्चित गुन्ह्यांमध्ये काही आरोपींना शिक्षा सुनावली तर काहींना पुराव्याअभावी निर्दोष सोडले. देवीचे रूप मानली गेलेली स्त्री खरोखरच किती सुरक्षित आहे याचा नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर घेतलेला वेध.
[…]

ऑक्टोबर १२ – विजय मर्चंट आणि २ दिवसांची कसोटी

एका विजय दहियाचा अपवाद वगळता नावात ‘विजय’ असलेल्या इतर सर्व जणांनी कसोट्यांमध्ये भारताकडून उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. विजय हजारे, विजय मर्चंट, विजय मांजरेकर आणि अगदी आत्त्ताच्या मुरली विजयची सुरुवातही आश्वासक आहे. अवघ्या दुसर्‍याच दिवशी संपलेली एक कसोटी १२ ऑक्टोबर २००२ रोजी शारजात सुरू झाली. […]

समाज भित्रा आहे का ?

भर रस्त्यावर कोणाचीतरी लुट होते. आजूबाजूचा समाज बघून न बघितल्यासारखे करतो आणि सरळ निघून जातो आणि तो मनुष्य मार खाऊन त्याची भरदिवसा लुट होत असते हे आपण ऐकले असेल किव्वा बघितले सुद्धा असेल. मग याला आपण काय म्हणाल समाज भितो का ? घाबरतो का ?
[…]

तंत्रयुगातही जुने तेच सोने !

तंत्रज्ञानात वेगाने प्रगती होत असताना आज प्रगत वाटणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे उद्याच जुनी होतात. नवी आणखी प्रगत उत्पादने त्यांची जागा घेण्यास टपलेली असतात. या जीवघेण्या स्पर्धेतही काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे अनेक वर्षे लोकप्रियता राखून आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण उपकरणांचा मागोवा.
[…]

इंग्रजी शाळांची मनमानी

नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने एक निर्णय देऊन सरकारला शाळांची फी निश्चित करता येणार नाही असे सांगितले. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे बर्‍याच इंग्रजी शाळांनी फी वाढ केली व त्यामुळे पालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. पण अर्थातच अनेक शाळांनी याला भीक घातली नाही. त्याचप्रमाणे काही ठिकाणी पालक पाल्याच्या भवितव्याच्या काळजीने गप्प बसले. पण एकंदरीतच मुलांच्या शिक्षणाचा खर्च हा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.
[…]

पाकिस्तानमधील प्रश्नांचा गुंता वाढला

दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यासाठी जोरदार मोहिम न राबवल्यास अमेरिका आपले भूदल पाकिस्तानमध्ये आणेल हा अमेरिकेचा इशारा, काश्मिरमध्ये सार्वमत घेण्याची पाकिस्तानने युनोत केलेली मागणी आणि जनरल मुशर्रफ यांची नव्या पक्षाची घोषणा या घडामोडींमुळे पाकिस्तानमधील प्रश्नांचा गुंता सुटण्याऐवजी वाढण्याचीच चिन्हे आहेत. अशा स्थितीत भारताने आपल्या भूमिकेवर ठाम रहाणे अधिक महत्त्वाचे आहे. […]

निसर्गाचे ‘रंग-ढंग’ चितारणारा अवलिया

भालजी पेंढारकरांसारख्या नररत्नाच्या पोटी जन्माला आल्यानंतर ‘रारंगढंग’कार प्रभाकर पेंढारकर यांना स्वत:ची कारकीर्द घडवताना नेहमीच एक गडद सावली सांभाळावी लागणार होती. त्यांनी ती लिलया जपत स्वत:चा ठसा उमटवला. त्यांच्या निधनामुळे स्वत:ची वेगळी वाट चोखाळणार्‍या एका व्यासंगी कादंबरीकाराला मराठी साहित्यविश्व अंतरल्याची हळहळ सतत जाणवत राहील. त्यांच्या स्मृतींना दिलेला उजाळा.
[…]

मराठी सॉफ्टवेअरमधील प्रमाणीकरण – समस्या आणि उपाययोजना

भारतीय भाषांचा संगणकावर उपयोग गेली वीसहून जास्त वर्षे होत आहे. मात्र दुर्दैवाने सुरुवातीची बरीच वर्षे केवळ डीटीपी म्हणजे मुद्रणविषयक गरजांसाठीच संगणकाचा मराठीत वापर होता. या काळात बर्‍याच तांत्रिक सुधारणा झाल्या. सुरुवातीच्या काळातील सी-डॅक, आकृती, आयटीआर, मॉड्युलर यासारख्या केवळ चारपाच मोठ्या सॉफ्टवेअर निर्मात्यांच्या जोडीने नवेनवे सॉफ्टवेअर निर्माते या क्षेत्रात येउ लागले. आपआपल्या परिने सॉफ्टवेअर बनवू लागले. बघताबघता वर्षामागून वर्षे जात होती आणि मोठ्या प्रमाणावर माहितीचा साठा मराठी आणि इतर भाषांमध्ये तयार होऊ लागला. वेगवेगळ्या कामांसाठी हा साठा वापरला जाऊ लागला, अगदी सरकारदरबारी आणि खाजगी क्षेत्रातही. आणि याच सुमारास काही अडचणीही आल्या. काय होत्या या अडचणी? त्या आतातरी दूर झाल्या आहेत का? यावरचे उपाय काय? या सर्वांचा वेध घेणारी ही लेखमाला… […]

1 36 37 38 39 40 98
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..