महाराष्ट्रात विस्तारतेय अतिरेक्यांचे नेटवर्क
गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात अतिरेक्यांचे नेटवर्क विस्तारू लागले आहे. स्थानिक पातळीवरील गरजू, बेरोजगार तरुणांना हाताशी धरून नवनवीन अतिरेकी कारवायांच्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. त्यासाठी विविध शहरांमधून माहिती गोळा करणारे स्लिपर्स सेल कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या समाजजीवनाला लागत असलेली ही कीड वेळीच रोखली नाही तर राज्याचे अपरिमित नुकसान होऊ शकते.
[…]