सप्टेंबर १७ – चार्ही डावात शतके आणि दुर्मिळ विजेतेपद
१९६९ मधील पुनर्रचनेनुसार इंग्लिश प्रथम श्रेणी हंगामातील सामन्यांची संख्या कमी करण्यात आली. तेव्हापासून एकाच हंगामात १,००० धावा आणि १०० बळी ही कामगिरी केवळ दोघांनाच साधली आहे.
एकदिवसीय स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे अंतिम सामन्यातील विजय आताशा खूपच दुर्मिळ झाले आहेत. १७ सप्टेंबर १९९४ हा दिवस मात्र त्याला अपवाद मानावा लागेल.
[…]