सुरक्षित, प्रागतिक चैतन्योत्सवासाठी
गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करायचा असेल तर त्यासाठी इच्छाशक्तीची, सद्सद्विवेकबुद्धीची गरज असते. गणेशोत्सव मंडळांनी समाजाशी असलेली बांधिलकी लक्षात घेऊन उत्सव विधायक पद्धतीने साजरा करायला हवा. उत्सवाच्या निमित्ताने गणेशासमोर नतमस्तक होऊन केवळ प्रार्थना करून चालणार नाही तर प्रयत्न, निष्ठा, निश्चय आणि भक्तीच्या साहाय्याने ध्येयाकडे मार्गक्रमण केले पाहिजे.
[…]