गणेश चतुर्थी
श्री गणेशाचा जन्म म्हणजे दुराचारांचा अंत, ह्याचा जन्म म्हणजे नवयुगाची प्रभात, याचा जन्म म्हणजे अंधकारात सापडलेल्यांना प्रकाशाचे किरण. तो जन्म ज्या तिथीला झाला ती ही आजची तिथी. मग ती उत्साहात न्हाऊन निघाली तर काय आश्चर्य ?
[…]
श्री गणेशाचा जन्म म्हणजे दुराचारांचा अंत, ह्याचा जन्म म्हणजे नवयुगाची प्रभात, याचा जन्म म्हणजे अंधकारात सापडलेल्यांना प्रकाशाचे किरण. तो जन्म ज्या तिथीला झाला ती ही आजची तिथी. मग ती उत्साहात न्हाऊन निघाली तर काय आश्चर्य ?
[…]
अथर्वशीर्ष हा उपनिषद् मंत्र असल्याने त्याच्या सुरवातीला व शेवटी शांती मंत्र आहे. अथर्वण ऋषी प्रारंभी मंगलाचरण करण्याच्या हेतूने ॐ हा मंगलमय शब्द उच्चारतात. त्यानंतर त्यांनी फार सुंदर वर्णन केले आहे. तत्वमसि हा शब्द खूप महत्वाचा आहे. अखिल चराचर व्यापून टाकणारे ब्रह्मस्वरूप तत्व. तूच प्रत्यक्ष दिसणारे ब्रह्मतत्व आहे असे ते म्हणतात. तूच सृष्टीचा निर्माणकर्ता, धारणकर्ता आणि संहारकर्ता तसेच सकलव्यापक ब्रह्म आहेस.
[…]
काँग्रेस पक्षाचे युवा नेते राहुल गांधी हे नुकतेच महाराष्ट्राच्या धावत्या दौर्यावर येवून गेलेत. […]
प्रतिजैविकांना दाद न देणारा सुपरबग प्रकटल्याने अवघे वैद्यकीय विश्व चिताक्रांत बनले आहे. पाश्चात्यांनी सुपरबगच्या निर्मितीसाठी सोयीस्करपणे भारताला जबाबदार धरले असले तरी त्यात तथ्य नाही. सुपरबगची निर्मिती पाश्चात्य राष्ट्रांमध्येच झाली असावी. असे असले तरी वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र म्हणून सुपरबगवर परिणामकरक प्रतिजैविक शोधण्याची जबाबदारी भारतावरही आहे.
[…]
देशात ३३ लाख स्वयंसेवी संस्था कार्यरत असल्या तरी या संस्थांनी नफा कमावू नये या मूळ उद्देशालाच हरताळ फासलेला दिसून येतो. काही संस्था निःस्पृहपणे काम करत असल्या तरी अनेक संस्था कर वाचवणे, प्रवर्तकांसाठी सुविधा निर्माण करणे,शासनाचा निधी उकळणे अशा कामांसाठीच स्थापन केल्या जातात. या संस्थांनी खरोखरच काम केले तर देशापुढील अनेक समस्या चुटकीसरशी सुटतील. […]
लॉर्ड्सवर यॉर्कशायरविरुद्ध शेष इंग्लंड संघाकडून खेळताना चार्ल्स फ्राय यांनी या दिवशी १०५ धावांची ‘सुंदर खेळी’ (विज्डेन आल्मनॅक) केली. ओळीने सहा प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये शतके काढण्याचा त्यांचा हा विक्रम अद्याप मोडला गेलेला नाही. १२ सप्टेंबर १९३७ रोजी भयावह कॅरिबियन द्रुतगती गोलंदाजांच्या तांड्यातील आणखी एका सरदाराचा जन्म झाला. वेस्ली विन्फील्ड हॉल त्याचं नाव. त्याच्या काळपट गळ्यातील सोन्याची साखळी तो धावू लागताच अस्ताव्यस्तपणे हले
[…]
गणरायाची सूचकता (वात्रटिका)
पॊटापासून डोळ्यांपर्यंत
एक एक अर्थ दिसला जातो !
सुपाएवढे कान असल्यामुळेच
डॉल्बीचा आवाज सोसला जातो !!
[…]
ब्रिटिश वर्चस्वाखालील हिंदुस्थानातील एका ‘काळ्या’ खेळाडूने सभ्य गृहस्थांच्या खेळात त्यांच्याचविरुद्ध शतक काढावे ही ताज्जुब की बात होती. खेळ संपल्यानंतर लालाजींभोवती प्रेक्षकांचा गराडा पडला. त्यांच्या गळ्यात पुष्पहार मावेनासे झाले. अनेक महिलांनी आपल्या अंगावरील दागदागिने काढून लालाजींना भेट म्हणून दिले. राजे-महाराजांनीही लालाजींना बक्षिसी दिली. भारतातर्फे पहिल्यांदाच शतक काढणारे लालाजी हे खरोखरीचे हिरो ठरले. भारतीय राष्ट्रवाद जिवंत झाल्याचा हा ढळढळीत पुरावा होता. लालाजींना पुन्हा मात्र कसोट्यांमध्ये कधीही शतक काढता आले नाही
[…]
पुलंचे काही किस्से
[…]
शेख अमर (शाहीर अमर शेख) ते सह्याद्रि (नोंदशीर्षकांतील तत्सम शब्द संस्कृतप्रमाणेच) एवढ्या नोंदींचा या खंडात समावेश आहे. ‘शेतकामाची अवजारे व यंत्रे’ ही प्रस्तुत खंडातील पहिली विस्तृत नोंद असून ‘संस्कृत साहित्य’ ही या खंडातील सर्वाधिक विस्तृत नोंद ठरते. रामदेवबाबा व रविशंकर यांच्यावरील नोंदी तितक्याशा तटस्थ व विश्वकोशीय प्रकृतीला मानवणाऱ्या गंभीर प्रकृतीच्या वाटत नाहीत. रामदेवबाबांच्या नोंदीतील गुगल या संकेतस्थळावर त्यांचा कार्यक्रम व यौगिक साधना यांना १७,५०० पृष्ठे दिलेली आहेत हे वाक्य या नोंदीचा दर्जा दाखविण्यास पुरेसे आहे. (पृष्ठ १९७).
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions