रणजी आणि पहिले एकदिवसीय द्विशतक
राजेशाही थाटाची, पौर्वात्य किमयेची आणि उच्छृंखल अशी फलंदाजी रणजी करीत. लवचिक मनगट अनेकांजवळ असते, वेळही बरेच जण अचूक साधतात पण या दोन्ही गोष्टींसोबत उपजत नजाकत ज्या फार विरळा किमयागारांजवळ असते त्यात रणजींचा समावेश होतो. १९९७ च्या विश्वचषकातील एका सामन्यात बांद्र्याच्या मिडल इन्कम ग्रुप ग्राऊंडवर बेलिंडाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील पहिले द्विशतक झळकावले. तोपर्यंतच काय, त्याच्यानंतरही सुमारे १३ वर्षे ही कामगिरी कुणाही पुरुषाला जमली नाही.
[…]