अर्जुनने घडवला इतिहास
गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय क्रीडाक्षेत्राला सुवर्णयश अनुभवायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी तेजस्विनी सावंतने जागतिक नेमबाजी स्पर्धेत प्रोन प्रकारात सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब करत देशाची मान उंचावली. जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक पटकावणारी सायना नेहवाल करोडो भारतीयांच्या अपेक्षा घेऊन जागतिक बॅडमिटन स्पर्धेत उतरली आहे. यापाठोपाठ अर्जुन अटवाल या गोल्फपटूने भारतीय क्रीडाक्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. त्याने विडहॅम चॅम्पियनशीप ट्रॉफी जिंकत विक्रम केला. […]