शेतकर्यांनी तयार केली पाण्याची बँक
सातारा तालुक्यात धावडशी हे छोटेसे गाव आहे. या गावातील १५ शेतकर्यांनी एकत्र येऊन गावातील विहिरी जोडण्याचा नवा विचार मांडला. सर्वानुमते योग्य नियोजन होऊन विहिरी जोडण्याचा निर्धार पक्का झाला. पाऊसकाळात पावसाचे प्रमाण चांगले असले तरी उत्तरेकडील मेरूलिंगच्या डोंगराकडील शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते. पावसाळा संपल्यावर शेतीसाठी जाणवणारे पाण्याचे दुर्भिक्ष संपविण्यासाठी या तरूणांनी विचार करण्यास सुरुवात केली. सातार्यातील सामाजिक कार्येकर्ते डॉ.अविनाश पोळ यांचे मार्गदर्शन त्यांना मिळू लागले. गावातील पोलीस पाटील ज्योतिराम पवार आणि त्यांच्या सहकार्यांनी पुढाकार घेतला आणि विहिरी जोडण्याचे काम सुरू झाले.
[…]