भेंडीचा पिवळा रस्सा
असं म्हणतात की दर चार कोसावर बोलीभाषेत बदल होतो. माझं तर असं निरीक्षण आहे की, दर दहा कोसावर भाजीच्या रस्स्याची चव बदलत असते. अगदी प्रयोग पहायला हरकत नाही. या गावाहून दुसर्या गावाला गेलं की रस्सा म्हणजे ग्रेव्हीत बदल होतोच.याचं कारण म्हणजे वापरण्यात येणारे मसाले, फोडणी देण्याची पद्धत आणि मुख्य म्हणजे तयार करणारे हात यांच्यात सतत वेगळेपण असतं.
[…]