2010
कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी ?
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाच्या गाथेत अनेक घराणी कामी आल्याचा उल्लेख आहे. छत्रपतींची इमानेइतबारे एकनिष्ठेने सेवा करण्यात ज्या दोन जाती इतिहास प्रसिद्ध आहेत त्यामध्ये महार समाज, ज्यांचा शिवाजी महाराज आदराने “नाईक” म्हणून उल्लेख करीत आणि दुसरा समाज कायस्थ प्रभूंचा होता. राजापूरचे बाळाजी आवजी चिटणीस, हिरडस मावळातील बाजी प्रभू देशपांडे आणि रोहीड खोरेकर देशपांडे नरस प्रभू गुप्ते या घराण्यातील पुरुषांनी स्वराज्याची सेवा हाच कुळधर्म मानला. मुत्सद्देगिरी, शौर्य आणि त्यागाची कमाल केली.
[…]
स्विमिंगसारखा दुसरा व्यायाम नाही!
स्विमिंगसारखा दुसरा व्यायाम नाही. व्यायाम केल्याने शरीर फिट राहते. थकवा दूर झाल्यानंतर आपल्याला ताजेतवाने वाटते. स्विमिंग करताना आपला संपूर्ण शरीराचा व्यायाम होत असतो. त्यामुळे स्विमिंग करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
[…]
शेंदुर्णीचे त्रिविक्रम मंदिर
मी आपल्याला खान्देशातील शेंदुर्णीला घेऊन जात आहे. येथील त्रिविक्रम मंदिराला मोठी पार्श्वभूमी आहे. श्री संत कडोजी महाराज शेंदूर्णी या पावन नगरीत वास्तव्यास होते. शिवकालीन श्री त्रिविक्रम मंदिराची स्थापना कडोजी महाराजांच्या हस्ते 1744 मध्ये झाली.
[…]
मराठी चित्रपटांशी संबंधित वाद सोडविण्यासाठी संयुक्त समिती – गृहमंत्री
मराठी चित्रपटांशी संबंधित वाद सोडवून धोरणात्मक निर्णयांसाठी शासन स्तरावर एक समिती स्थापन करण्याची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली.
[…]
सलग 423 सामने आणि सिम्मोचे 16 षटकार
1954 ते 1969 या 15 वर्षांच्या कालावधीत ससेक्स संघाने काऊंटी चॅम्पिअनशिप स्पर्धेत खेळलेल्या सर्वच्या सर्व 423 सामन्यांमध्ये केनचा संघात ‘खेळणार्या अकरा’मध्ये समावेश होता! ओळीने 15 वर्षांत 4-2-3 सामने! 1953 ते 1969 या कालावधीतील (सलग) 17 हंगामांमध्ये 1,000 धावा काढण्याचा पराक्रम त्याने केलेला आहे.
[…]
देव दर्शनास पूर्व परवानगी ?………….
माउंट मेडोना सेंटर च्या संकट मोचन हनुमान मंदिरात दर शनिवार च्या देर्शनासाठी घ्यावी लागते. हा नियम कटाक्षाने पाळला जातो कारण मंदिराची वाहन व्यवस्था मर्यादित असल्या मुळे त्यांना आगाऊ परवानगी देणे प्राप्त आहे.
[…]
आधुनिक काळातील वैभव लक्ष्मीचं व्रत
……………मग त्याने मराठी माणसे धंद्यात मागे का? या विषयावर परीसंवाद भरवला पण तो मात्र जिथल्या तिथेच राहिला. त्याची बायको खूप दु:खी झाली. एके दिवशी ती झोपली असताना देवी लक्ष्मी तिच्या स्वप्नात आली आणि आधुनिक काळातील वैभव लक्ष्मीचे व्रत तिला सांगितले. […]
कुपोषणावर प्रभावी ‘अमरावती मिक्स’
बालकांमध्ये असलेले कुपोषण दूर करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरी व ग्रामीण भागातही कुपोषण श्रेणीत असलेल्या बालकांना पोषण आहार पुरविण्याचा प्रभावी कार्यक्रम सुरू आहे. कुपोषित बालकांना ‘अमरावती मिक्स’ या नावाने तयार करण्यात आलेल्या आहारात शेंगदाणे, चणे, गूळ, कडधान्य यांचे मिश्रण तयार करण्यात येते. यात १४०पेक्षा जास्त कॅलरी आहेत आणि हा संपूर्ण आहार आरोग्य केद्राच्या कर्मचार्यामार्फत तयार करण्यात येतो. ‘अमरावती मिक्स’ नावाने ओळखल्या जाणारा हा पोषण आहार मेळघाटातील बालकांनाही उपयुक्त ठरणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागानेही अमरावती मिक्स हा प्रयोग अत्यंत प्रभावी असून संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
[…]
सौर ऊर्जेवरील मोटारीमुळे शेतकर्यांना दिलासा
हिंगोली येथील जलस्वराज्य प्रकल्पाने सौर ऊर्जेव्दारे पाण्याची मोटार चालविण्याचा यशस्वी प्रयोग करुन वीजेच्या भारनियमनावर मात केली आहे. त्यामुळे शेतकर्यांना नवी स्फूर्ती मिळाली आहे.
[…]