अंतर्गत मतभेदांनी ग्रासले राज्यकर्ते
भिन्न मतप्रवाहांचे अनेक पक्ष एकत्र घेऊन सरकार चालवणे अवघड असल्याचा अनुभव पंतप्रधान डॉ. मनमोहन सिग यांना रोजच येत आहे. विविध पक्षांचे मंत्री एकमेकांवर आरोप करत असताना काँग्रेसचे वरिष्ठ मंत्रीही गेल्या काही दिवसांपासून सहकार्यांबद्दल जाहीर विधाने करताना दिसत आहेत. त्यांच्यात अनेक मुद्यांवर असलेले मतभेद सतत चव्हाट्यावर येत आहेत. अशा परिस्थितीत मनमोहन सिंग निष्प्रभ आणि हतबल दिसत आहेत. […]