हम दो – हमारे दो
११ जुलै हा गेली २३ वर्षें ‘विश्व लोकसंख्या दिन‘ म्हणून जगभर पाळला जात आहे. ११ जुलै १९८७ रोजी पृथ्वीवर पाच अब्जावे मूल जन्मले. तेव्हापासून हा दिवस ‘विश्व लोकसंख्या दिन‘ म्हणून मानला गेला आहे. १२ ऑक्टोबर १९९९ रोजी विश्व लोकसंख्या सहा अब्ज झाली. आणि २००१ च्या जनगणनेनुसार, आपला भारत देश एक अब्ज लोकसंख्येचा झाला. स्वातंत्र्यानंतर ५४ वर्षांच्या काळात भारताची लोकसंख्या तिप्पट झाली. भारतात मृत्युदर आहे- दर हजारी ९ व जन्मदर आहे- दर हजारी २४. […]