दिलासा ट्रस्ट
दिलासा ट्रस्ट ही डोंबिवली येथील संस्था स्पास्टिक्स (सेरेब्रल पाल्सी) या व्याधीने ग्रासलेल्या मुलांच्या संदर्भात उल्लेखनीय कार्य करीत आहे. सुरवातीला सामाजिक कार्याची आवड असलेल्या काही महिला एकत्र आल्या आणि मग त्यांना एका संस्थेची गरज वाटु लागली आणि त्यातूनच सन २००० मध्ये ही संस्था स्थापन झाली.
[…]