ठाण्यातील कामगार भीमराव भंडारेंची ’आत्महत्या‘…की, ’सरकारी हत्या‘(?)
लोकमान्य टिळक म्हणाले होते की, ”शेतकरी व कामकरी (कामगार) हेच या देशाचे मालक आहेत!“… याचा साधा सरळ अर्थ हा की, समाजातील इतर अभिजनवर्ग हा कामगारांनी निर्माण केलेल्या ’अतिरिक्त मूल्याचा‘ आणि निसर्गशक्तिच्या (विशेषतः सूर्यप्रकाश) सहाय्यानं शेतकर्यांनी निर्मिलेल्या अतिरिक्त खाद्यान्नांचा, तसेच इतर पूरक गोष्टींचा (उदा. कापूस) आधार घेऊन जगत असतो. […]