स्वरपंढरीचा यात्री
वर्षानुवर्षांची संगीतसाधना आणि अपार परिश्रम घेण्याची तयारी यातून निर्माण झालेला या क्षेत्रातील तेजस्वी तारा म्हणजे भीमसेन जोशी. या स्वरभास्कराने आजवर अनेक मैफिलींमधून लाखो रसिकांना तृप्त केले. गुरुप्रती असणार्या निष्ठेतून सवाई गंधर्वसारखा महोत्सव सुरू करून नवोदितांना व्यासपीठ मिळवून दिले. अशा या स्वरपंढरीच्या यात्तिकाचे जाणे चटका लावणारे आहे. त्यांना वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली.
[…]