दिवस सोनियाचा की `सोनिया’पुत्राचा
समजा राहूल गांधींनी ही घराणेशाही स्वच्छता मोहिम अगदी मनावर घेतलीच तरीही आमच्या नेत्यांना काळजी करण्याचे कारण नाही. त्यांना एक मोलाचा सल्ला जाताजाता देउया. Charity begins at home! या न्यायाने राहूलजींनाही सांगून टाका की बाबा आम्ही आमची घराणेशाही संपवतो पण तुमचे काय? तुम्हीही एकदा सांगून टाका ना की मला स्वत:लाही घराणेशाही नकोय. मला पंतप्रधान वगैरे काही व्हायचे नाही. पक्षात कितीतरी आजोबा आणि काका आहेत.. त्यांच्याही इच्छा पूर्ण होउ द्या. होउन दे त्यांना पण पंतप्रधान!
[…]