जळतं आहे प्रजासत्ताक
जळतं आहे प्रजासत्ताक आणि मी जिवंत आहे त्या आगीच्या झळया खात
मेले आहेत माझे मित्र आणि माझं आयुष्य बनलंय एक आफत.
माझ्या मातेचा पदर भिजलाय रक्तानं आणि अश्रूंनी
माझी प्रियतमा आणि माझे लोक वाहून गेलेत, जळून गेलेत
मी कसा वेड्यासारखा म्हणतोय, अजूनही ते दिवस येतील
डोंगराला वेढणारा प्रकाश आगीचा नसेल, सूर्याचा असेल… […]