पहिले आंतरराष्ट्रीय ऊर्जा संमेलन
२१ व्या शतकातील दुसर्या दशकाच्या शेवटी पृथ्वीवरील पाणि, ऊर्जा, जमीन एकूणच निसर्गातील पंचमहातत्वाच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत आहे.एवढंच नव्हे तर पुढील पिढीला देण्यासाठी आपल्याकडे नैसर्गिक संपत्तीचा ठेवा कदाचित उरणार नाही एवढा र्हास होत आहे. जमिनीचा वरचा थर तयार होण्यासाठी किमान ६०० वर्ष इतका वेळ म्हणजे जवळ जवळ ६ शतकांचा कालावधी लोटतो. हे एक उदाहरण झालं मात्र यासारखी कितीतरी नैसर्गिक साधन संपत्ती आपण रिसायकल न करता पिढय़ानुपिढय़ा वापरत आहोत, यासाठीच विज्ञानभारती व केंद्रीय ऊर्जा व नवीनकरणीय खात्यातर्फे पहिल्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा संमेलनाचे आयोजन विश्वसरैय्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथे आयोजन केले होते.
[…]