पर्यटन विकास महामंडळ रायगड जिल्ह्याचा विकास
उन्हाळयाची चाहूल लागताच पुणे -मुंबई सारख्या शहरवासियांची मने थंड हवेच्या ठिकाणांचा वेध घेतात. रोजच्या धकाधकीच्या व कोंदट वातावरणातून चार घटका सुखाच्या कराव्या असा विचार त्यांच्या मनात डोकावतो.परंतु सर्वच पर्यटन स्थळे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नसतात.
[…]