मी बुवा बनतो (विनोदी कथा)
उपहासात्मक विनोदी कथा
[…]
उपहासात्मक विनोदी कथा
[…]
समर्थ रामदासांनी छत्रपती शिवरायांना लिहिलेले पत्र –
निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी ॥
[…]
एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं… असं वाटण्याची जागा, मूल झालं की… मोठं घर झालं की… अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते . दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत . ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल , अशी आपण मनाची समजूत घालू लागतो .
[…]
स्वामी विवेकानंद म्हणत “स्वातंत्र्य काय आपण एका दिवसात आणून दाखवू शकतो. पण त्यासाठी आपण तयार झालो आहोत काय? समाज जोपर्यंत त्यासाठी पूर्णतः तयार होत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य अर्थहीन आहे.” स्वामी विवेकानंदांचा हा प्रश्न आपण सर्वांनी स्वतःला विचारायला हवा. आपण खरंच स्वातंत्र्याच्या लायकीचे आहोत काय? मानसिक गुलामच आहोत आपण. परकियांनी लिहिलेल्या इतिहासाबद्दल आम्हाला (हिंदूंना) पराकोटीचा आदर वाटतो. म्हणे सिकंदर हा जगज्जेता होता. अहो, ज्या माणसाला भारताचा साधा एक प्रांत टिकवता आला नाही, तो माणूस जगज्जेता कसा असू शकेल? त्याला स्वतासाठी, देशासाठी काहीच करता आले नाही म्हणून त्याच्याच गुरुने (ऍरिस्टॉटलने) त्याला विष पाजून मारून टाकले. […]
भारताला स्वातंत्र्य मिळून ६३ वर्षे झाली. मुळात भारताला स्वातंत्र्य मिळाले तेच भारताचे तुकडे होऊन. ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य न देता, भारतातील संस्थानांना स्वातंत्र्य दिले. भारताचे दोन भाग पाडले. भारत आणि पाकिस्थान असे दोन राष्ट्र निर्माण झाले. भारताने लोकशाहीचा स्वीकार केला. आज भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश मानला जातो. सरदार वल्लभभाई पटेलांनी साम, दाम, दंड यांचा यथायोग्य वापर करुन भारत एकसंध राष्र्ट केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली लिहिली गेलेली घटना म्हणजे भारतातील लोकशाहीचा कळसंच
[…]
मी सकाळी चाळीच्या संडासाबाहेर, तुझि वाट पाहत असायचो.
माझा नंबर आला, तरी दुसर्यांना जाऊ द्यायचो.
[…]
आता तुम्ही म्हणाल की हे सारं सव्यापसव्य करणं वैज्ञानिकांना ठीक आहे हो. आम्ही कुठं असं संशोधन करायला जातो? किंवा आमची काय टाप आहे आईन्स्टाईन महाराजांची खोडी काढण्याची! शिवाय त्यांच्या विधानाबद्दल शंका घ्यायला आधी ते काय म्हणताहेत हे तर समजायला हव. तिथंच तर आमचं घोडं पेंड खातं. […]
ती दूरचित्रवाणीवर एक जाहिरात आजकाल दाखविली जाते. एरवी या जाहिराती फारशा कल्पक असतात असं नाही. काही तर हास्यास्पदच असतात. पण ही मात्र विचार करायला लावणारी आहे. कोणाच्या तरी नावाचा जयघोष करत लोकांचा एक समूह एका तरुणाकडे येतो. त्यातलाच काळा चष्मा घातलेला एक मध्यमवयीन माणूस पुढं होतो. त्याच्या चेहर्यावर एक प्रकारचा मग्रूर आत्मविश्वास आहे. […]
एक दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये त्या पूर्वीची दोन वर्षं कोरडी गेली होती. अवर्षणाचा तडाखा त्या भागाला बसला होता. खरं तर हा प्रदेशच मुळी पर्जन्यछायेतला आहे. […]
वास्तविक आपले सण असे नियमितपणे एका ठराविक तारखेला कधीच येत नाहीत. त्यांच्यात वर्षागणिक बदल होत असतात. मग ती गणेश चतुर्थी असो, दसरा असो, गुढी पाडवा असो की दिवाळी असो. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions