नवीन लेखन...

सध्याचे मिरवणुकांचे चित्र कधी बदलणार

नुकतीच भगवान महावीर जयंती झाली, त्यानिमित्ताने ठिकठीकाणी शोभायात्रा निघाल्या. प्रतिवर्षाप्रमाणे आमच्याही गावात ही शोभायात्रा संपन्न झाली. भगवान महावीर जयंती निमित्ताने जैन समाजातर्फे दरवर्षी निघणारी ही मिरवणूक लहानपणापासूनच माझ्या आकर्षणाचा विषय ठरत आलेली आहे.
[…]

जुने ते सोनेच होते!

’झिरो बजेट’ शेती किंवा नैसर्गिक शेती हाच शेतकर्‍यांच्या समस्यांवरचा एकमात्र तोडगा आहे. जुने तेच सोने होते, हे आता सिद्ध झाले आहे. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ही केवळ गोष्टींच्या पुस्तकात आहे, हे शेतकर्‍यांनी लक्षात घ्यायला हवे. निसर्गाला आव्हान देऊन आपण उभे राहू शकत नाही. एवढ्या शक्तीशाली जपानचे अवघ्या दोन दिवसात मातेरे झाले. आधुनिक तंत्रज्ञान जोपर्यंत निसर्गाशी इमानदार आहे तोपर्यंत ते ठीक आहे, त्याच्या पुढची पायरी गाठण्याचा प्रयत्न हे तंत्रज्ञान करीत असेल तर शेवटी सगळ्याची माती होणार हे निश्चित!
[…]

“वन औषधी अग्निशिखा”

आपल्या बागेतील फुल पाहताच कोणाचेही लक्ष वेधून घेणारी वनस्पती म्हणजे ‘अग्निशिखा’ होय.अग्निशिखा ही वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.जंगलात शोध घेतला तर ही वनस्पती खूपच विरळ प्रमाणात आढळून येत आहे. जंगलांना वारंवार लागणाऱ्या आगींमुळे ह्या वनस्पतीचे जमिनीतील कंद नष्ट होतात.पर्यायाने ही प्रजाती दुर्लभ झाली आहे.नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या ह्या वनस्पतीला आपल्या परसबागेत स्थान देण्याची आज निकड निर्माण झाली आहे.
[…]

महाकवि कालिदास कृत रघुवंश

मूळ संस्कृतात, श्री महाकवि कालीदास रचित रघुवंश च्या ऋचा मराठीत अनुवाद्, कै नागोराव बासरकर ह्यानी ५० वर्षा पूर्वी केलेले आहेत. ह्या ऋचा संग्रहीत करून आपल्यासाठी रोज देत जाईन. कृपया आपला अभीप्राय जरुर नोदवावा.

—–माधव नागोराव बासरकर .

रघुवंश सर्ग ३ ( वृत – – वंशस्थ )

तदा पतीच्या आभिलाष पुरणा /

साखिचीया लोचन मुख्य तोषाणा /

ृइक्ष्वाकुच्या संतती आदिकारणा /

सुदक्षीणा दावित गर्भलक्षणा // १ //
[…]

गोजिर्‍या बाळासाठी साजिर्‍या नावाची निवड.

बाळाचं नाव, सुटसुटीत, अुच्चारायला, लिहायला सोपं, प्रचलीत काळाशी सुसंगत असावं आणि त्याचा अुच्चार कानाला नादमधूर वाटला पाहिजे. म्हणूनच स्वर आणि मृदू व्यंजनं असलेली दोन किंवा तीन अक्षरी, जोडाक्षर विरहित आणि मानवी मनाला आणि भावनांना हव्याहव्याशा वाटणार्‍या निसर्गातील घटकांशी आणि वस्तूंशी निगडीत असलेली नावं सर्वांना आवडतात. बाळाचं नाव, बाळाप्रमाणेच सर्वांना हवंहवंसं वाटणारंच असाव्यास हवं, नाही का?
[…]

तू

तू

जीवनाच्या प्रवासात तासन – तास उभ राहून

एखाद्या स्त्रिची वाट पाहण्याची सवय तू मला लावलीस

आणि स्वत : मात्र नामानिराळी राहिलीस ……
[…]

इमान पगारासोबत, की देशासोबत?

सज्जनांची निष्क्रियता दुर्जनांच्या दुष्टपणापेक्षा अधिक घातक आहे. सरकारी कर्मचार्‍यांनी हे लक्षात घ्यायला हवे, की त्यांची बांधीलकी त्यांच्या नोकरीपेक्षा अधिक या समाजाशी, या देशाशी आहे. या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या घामातून जो पैसा उभा होतो, त्यातूनच त्यांना पगार, भत्ते वगैरे मिळत असतात. अशा परिस्थितीत जिथे सामान्य लोकांच्या हक्कावर गदा आणणारे, सामान्यांचे शोषण करणारे भ्रष्टाचार होतात तिथे त्यांनी मौन बाळगणे म्हणजे बेइमानी ठरते.
[…]

1 4 5 6 7 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..