आशा भोसले – एक सांगितिक आश्चर्य
आशाताईंच्या सहा दशकांच्या महान कारकिर्दीकडे नुसती नजर टाकायची म्हटलं तरी थक्क व्हायला होतं. एक हजारांपेक्षाही जास्त हिंदी चित्रपटांतून त्यांनी बारा हजारांपेक्षाही जास्त गाणी गायलेली आहेत. शिवाय इतर अनेक भाषांतली गाणी वेगळीच. मग चित्रपटेतर गायन गजला, पॉप म्युझिक, मराठी नाट्य संगीत, भावगीते, बालगीते, भक्तिगीतं, अभंग वगैरे वगेरे वगैरे… चतुरस्र हा शब्दही कमी पडावा अशी कामगिरी त्यांनी केली आहे. […]