विविध गुणधर्म असणाऱ्या शतावरीची शेती केल्यास अधिक फायद्याची ठरू शकते, शतावरीच्या वाळलेल्या मुळ्या ३०० ते ४०० रुपये प्रती किलो दराने विकल्या जातात. वार्षिक सरासरी पर्जन्य २५० ते ३०० से.मी.पडतो, तसेच १० ते ५० डिग्री सेल्सियस तापमान आहे त्या ठिकाणीही सहजपणे उत्पादन घेता येते. शेतकऱ्यांना वरदान ठरू शकणाऱ्या ह्या औषधी वनस्पतीच्या शेतीला सुरुवात होणे आवश्यक आहे.
गुणधर्म /उपयोग :- शीत, तिक्त, बुद्धिवर्धक, अग्निवर्धक, शुक्र दुर्बलता दूर करणारी, अशक्तपणा दूर करणारी, अनेक स्त्रीविकारांमध्ये उपयोगी, ऐनिमिया, संधिवात, अर्धांगवायू, लचक, मुरड तसेच हृदयाला बल देणारी व संकाचन क्षमता वाढविणारी, तसेच स्त्रीयांमध्ये गर्भाशय उत्तेजना थांबवून गर्भाशयाची गती संतुलित करणारी. निद्रानाश, रातआंधळेपणा, स्वरभंग, डोकेदुखी तसेच विषघ्न आहे.
[…]