आपण हे बदलू शकतो का?
आता आनंद, जल्लोष व उत्साहाने सण व उत्सवांना सुरुवात होईल. आपले सण व उत्सव मोठया आनंदाने आणि प्रेमाने साजरे केलेच पाहिजेत याबद्दल दुमत नाही. तरुणांत उत्साह आहे, पण त्याला शिस्तीची जोड कुठेतरी कमी पडते किंवा अतिउत्साहात तिचा विसर पडल्याचे सतत जाणवते. सण व उत्सवाचे पावित्र्य, महात्म्य, त्यामागील कार्यकारणभाव प्रकर्षाने व्यक्त होताना दिसतो परंतू त्याला स्पर्धात्मक, व्यापारी आणि राजकारणाची झालर असलयाचे जाणवते.
[…]