नवीन लेखन...

“प्रिय अमुचा ‘एक’ महाराष्ट्र देश हा”

महाराष्ट्र राज्य निर्मितीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा व अभिनंदन. स्वतंत्र महाराष्ट्र निर्मितीसाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्यांचे स्मरण आपल्या प्रत्येकाला दर वर्षी १मे रोजी होते. परंतू सध्याचे राज्यकर्ते हुतात्म्यांचे बलिदान सार्थकी ठरवून आणि स्मरून साजेशी वागणूक महाराष्ट्रातील जनतेला देतात का ? त्यांच्या प्रश्नांची उकल करतात का ? त्यांच्या प्रश्नांना खरोखरच न्याय मिळतो का ? जर याचे उत्तर ‘होय’ असेल तर हुतात्म्यांच्या आत्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. पण उत्तर ‘नाही’ असेल तर परिस्थिती नक्कीच राजकारणी व जनतेला आत्मचिंतन करणे जरूरीचे ठरेल.
[…]

अंध महिला पुनर्वसन समिती, अलिबाग

दृष्टी ही आपल्याला मिळालेली आतापर्यंतची सर्वात सुंदर व मौल्यवान भेट आहे. ज्या निसर्गात आपण लहानाचे-मोठे होतो त्या निसर्गाचे गहिरे रंग व विविध छटा, आपल्या आवडत्या व्यक्तींचे चेहरे व त्या चेहर्‍यांवरचं फुललेलं हास्य, दवात भिजलेली पहाट, मावळताना आजूबाजूच्या मखमली आभाळावर केशरी रंग सांडून गेलेला सूर्य, गाणारे पक्षी, रात्रीच्या गडद साम्राज्यात अवतरलेली अतिशय धीट अशी चंद्राची कोर, बेभान झालेला पाऊस, खवळलेला समुद्र, हिरव्यागार डोंगरांधून वाहणारे मोतीदार झरे, व या निसर्गसृष्टीला हिरवा श्वास देणारी झाडे या सर्व गोष्टीचं हृदयात चिरंतन जतन करण्यासाठी व आयुष्यात असे अनुभवलेले बहारदार क्षण व आठवणी अजरामर करून टाकण्यासाठी दृष्टीची नितांत गरज असते.
[…]

“परी नेत्र रूपे उरावे”

लेखकाने किंवा कवीने निसर्गाचे किंवा चित्राचे तसेच पदार्थाचे सोप्या भाषेत वर्णन केले असले तरी एखाद्या अंध व्यक्तीने ती गोष्ट आपल्या डोळ्यांनी जन्मताच बघितली नसेल अनुभवली नसेल ते फिलिंग नसेल तर त्या वर्णनाचा काय अर्थ आहे? ज्या व्यक्तीला दिसत होते पण अचानक अपघातात दृष्टी गेली तर त्या व्यक्तीला दैनंदिन जीवन जगताना त्या आठवणीने किती यातना होतील? जीव किती कासावीस होईल याचा विचारच करवत नाही. पाच मिनिटे लाईट (वीज) गेले तर आपली काय अवस्था होते ते सर्वांनी अनुभवले असेल ! खेळात आंधळी कोशिंबीर खेळतांना अनुभव घेतला असेल ! […]

शेतकरी निर्मूलनाची तयारी पूर्ण

सरकार तुम्हाला मारायला उठले असेल तर तुम्ही कुत्र्या-मांजरासारखे न मरता प्रतिहल्ला करायला का घाबरता? जीवावर उदार झालेल्या लोकांनी या जगात अनेक क्रांत्या घडवून आणल्या आहेत, अनेक सिंहासने पालथी केली आहेत. तुम्ही जीवावर उदार होतच असाल तर जाताना असा दणका देऊन जा, की पुन्हा शेतकर्‍यांच्या वाटेला जाण्याची हिंमत कुणी करू शकणार नाही!
[…]

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती…

प्रामाणिकपणा आणि त्या कष्टाचं बाळकडू या वारीत तूझ्या समस्त भक्तांना पाज…. त्यांना आशिर्वाद दे कुठल्याही विध्नाला सामोरं जाण्याची.. तू विध्न देतोस त माणूस घडण्यासाठीच मग त्यातून माणूस घडू दे देवा.. राक्षस या लढाईत हरू दे.. तूझ्या या भक्ताचं हेच साकडं आहे तूझ्याकडे..
[…]

जाहिरात आणि सदोबा / (वात्रटिका)

सदोबा जाहिरातीला भुलून नेहमीच खरेदी करतो. पण जाहिरातीत दिलेला इशारा त्याला समजत नाही “डाग चांगले असतात” असं चक्क जाहिरातीत म्हंटले असतानाही सदोबाने ते साबण खरेदी केले. मग काय जाहले असेल:
[…]

टर्निंग पाँईंटस

हे सगळे सांगण्याचा उद्देश हा की आज आपण सर्वत्र बघतो नवरा-बायकोत कुठल्या ना कुठल्या कारणांनी दररोज भांडणे चालू असतात व त्याची परिणीती वेगळ्याच वाटेने होते. काही महिन्यांन पूर्वी मुंबईतच तीन स्त्रियांनी इमारतीच्या वेगवेगळया मजल्यावरून उड्या मारून आत्महत्या केल्या होत्या व नुकतीच २७ जून रोजी कांदिवली (प), लोखंडवाला संकुलातील एका इमारतीच्या १९व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे बोलके उदाहरण आहे. सध्या वारंवार असे का घडते आहे?
[…]

1 4 5 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..