August 2011
अरेरे !!!!
कविता
[…]
अशीही एक भेट
१९९७ सालच्या जुन-जुलै चा काळ. आम्ही उभयता कैलास-मानसरोवरच्या यात्रेला गेलो होतो. एकूण ३० दिवसांची खडतर यात्रा झाली. परंतु जीवनामध्ये एक जबरदस्त आठवण निर्माण करुन राहिली. आपल्या धार्मिक द्दष्टीकोणातून ज्या अनेक यात्रांचे वर्णन केले गेले, त्यामधील सर्व श्रेष्ठ अशी ही समजली जाते. आजच्या अधुनिक युगांत देखील, ती यात्रा यशस्वीपणे पूर्ण करणे म्हणजे एक भाग्यच वाटते. एक निसर्गरम्य साईटसीईंग ह्या दृष्टीकोणातून ती यात्रा खूपच महत्वाची वाटली. […]
आण्णाचा विजय…….लोकशाहीचा विजय……!!!!!
अखेर अहिंसाच्या मार्गाने आण्णांनी भ्रष्टाचारा विरुद्धची पहिली लढाई जिंकली. ४५ वर्षानंतर लोकपाल विधेयकावर संसदेत एकमत झाले ही एक ऐतिहासिक घटना होय.
[…]
बोनस
एकदा लंच पिरीयड मध्ये जेवणाचे डबे उघडून आम्ही सारे सहकारी जेवणाचा आनंद घेत होतो. अर्थात जेवणापेक्षा महत्वाच्या गप्पा. कुणाला तरी लॉटरी लागली होती त्याची माहिती कुणी सांगत होते. जयेश अमिन हा ग्रीनकार्ड धारक ब्रॅंचमधे अनेक वर्षे होता. तो अमेरिकेत येऊनही बरीच वर्षे झाली होती. न्यू यॉर्क शाखेतील स्टाफने एकदा सर्वात मिळून घेतलेल्या तिकिटाला किती पैसे मिळाले होते त्याचे त्याने वर्णन केले. पुन्हा एकदा तिकिट घ्यायचे चालले होते.
[…]
दिल्लीतील मराठी पाऊलखुणा
दिल्ली व मराठी माणूस यांचे नाते अतूट आहे. या संबंधाचा ऐतिहासिक मागोवा घेतला तर १७०७ सालापासून १८०३ सालापर्यंतचा सलग कालखंड डोळयासमोर येतो. शहेनशहा औरंगजेबच्या मुत्युनंतर येसूबाई व इतर २०० जण दिल्लीत डेरेदाखल झाले आणि हेच दिल्लीचे पहिले मराठी निवासी होत. १७०८ ते १७६९ या काळातील अंतोजी माणकेश्वर, महादेव हिंगणे, महादजी अशा चतुर, मुत्सद्दी सरदारांनी पेशव्यांच्यावतीने दिल्लीत अंमल केला. मराठी वकिलातीचे हे पहिले पाऊल म्हणावयास हरकत नाही.
[…]
एसओएस (SOS) चिल्ड्रेन्स व्हिलेज, परगुरपाडा, अलिबाग
खरी समाजसेवा ही कुठल्याही जात, रंग, धर्म, वंश, प्रादेशिकतावाद किंवा अगदी राष्ट्रवाद या पारंपारिक बंधनांच्या पलीकडची असते. कारण मानव कुठलाही आणि कसाही आणि कसाही असो त्याच्या गरजा आणि समस्या सारख्याच असतात अनेक आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था आज भारतातील विविध स्तरांमधील लोकांसाठी कार्यरत आहेत, आणि समाजसुधारणा क्षेत्रातील अनेक विकासकामांना आज गती आणि जागतिक स्वरूप प्राप्त झाले आहे. […]
लिव्हिंग फ्री फाऊंडेशन – आवास (व्यसनमुक्ती केंद्र)
माणूस कधीही न संपणार्या अडचणींमुळे वाढत्या ताणतणावांमुळे दुःखांमुळे अपमानामुळे, मित्रांच्या आग्रहामुळे, किंवा निव्वळ मजा किंवा कुतूहल म्हणून दारूचा पहिला पेला तोंडाला लावतो आणि बहुतांशी लोकांच्या जीवनाला तो पेला कायमचा चिकटतो. जसे जसे दिवस जातात तसे तसे आई-बाबंच्या अपेक्षा आणि स्वप्ने नातेवाईकांचे सल्लेए जीवलग मित्रांची कळकळ,यांच्यापासून तो फार लांब जातो आणि कुठलाच आवाज अगदी मनाचासुध्दा, त्याला ऐकू येईनासा होतो. […]