” गुडूची कटुका तिक्ता स्वादुपाका रसायनी |
संग्रहिणी कषायोष्णा लध्वी बल्याग्नि दीपनी ||
दोषज्यामतृडदाहमेहकासाश्च पाण्डूताम |
कामला कुष्ठवातास्रज्वरकृमीवमीर्हरेत ||”
-(भाव प्रकाश )
गुळवेल ह्या वनस्पतीला भारतीय उपचार पद्धती तथा आयुर्वेदात फार महत्व आहे. आयुर्वेदात गुळवेलाला अमृता हे नाव दिले आहे. नावाप्रमाणेच ही वनस्पती अमर आहे,जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाली तरीही ही वनस्पती सहजतेने जीवंत असते.
रासायनिक घटक- ग्लुकोसीन, जीलोईन, १.२ टक्के स्टार्च, बर्वेरीन, ग्लुकोसाईड, गिलोइमिन, कैसमेंथीन, पामारीन, रीनात्पेरीन, टीनास्पोरिक, उडनशील तेल, वसा, अल्कोहोल, ग्लीस्टोराल इत्यादी घटक आढळतात.
एवढे महत्वपूर्ण घटक असलेल्या या वनस्पतीमध्ये ‘मायक्रोबैक्टेरीयम ट्युबरकुलौसिस’ (Tuber Culosis), ‘एस्केनीशिया कोलाई’ या आतडे आणि मूत्रसंस्थेवर परिणाम करणाऱ्या रोगाणु ला नष्ट करते, तसेच विषाणू समुह व कृमी आदी नष्ट करण्याची क्षमता या दिव्या वनस्पतीमध्ये आहे. […]