“ब्रम्हचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज”
श्री गोंदवलेकर महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १८४५ साली (माघ शु.१२ शके १७६६) गोंदवल्यास झाला. त्यांचे मुळ घराणे माणदेशातील दहिवडी जवळ वावरहिरे या गावचे. त्यांचा मुळ पुरूष रूद्रोपंत व त्यांचे आडनाव घुगरदरे. घुगरदरे वासिष्ठ गोत्री शुक्ल यजुर्वेदी ब्राम्हण असून रूद्रोपंत पंढरीच्या विठ्ठलाचे एकनिष्ठ उपासक होते. महाराजांचे पणजोबा कुलकर्णीपण करण्यासाठी गोंदवल्यास येऊन स्थायिक झाले तरी पंढरीचीवारी घराण्यात कायम होती.
[…]