उपवास आणि उपवास
उपवास आणि उपवासात फरक हा नेहमीच असतो.सामान्य माणसाचे उपवासाकडे कुणाचेही लक्ष जात नाही. खरे म्हणाल तर आपल्या देशात पन्नास टक्के लोकअर्धपोटी राहतात. ते रोजच उपवास करतात. ……..
[…]
उपवास आणि उपवासात फरक हा नेहमीच असतो.सामान्य माणसाचे उपवासाकडे कुणाचेही लक्ष जात नाही. खरे म्हणाल तर आपल्या देशात पन्नास टक्के लोकअर्धपोटी राहतात. ते रोजच उपवास करतात. ……..
[…]
राष्ट्रीय अथवा लोकनेत्यांच्या नावावर, देवी- देवतांच्या नावावर देणग्या उखळल्या जाण्याचा फंडा काही आजचा नाही. अशा निमित्ताने मोठ्या प्रमाणात देणगी गोळा केली जाते. मात्र या देणग्यांचा हिशेब सार्वजिक केला जात नाही. किंवा धर्मादाय आयुक्तास सादर केला जात नाही.
[…]
नुकताच दक्षिण आफ्रिकेला जाण्याचा योग आला होता. निसर्गच वरदान लाभलेली भूमी. असे वर्णन तिचे करता येईल. ऊतम हवा, भरपूर पाणी, नद्या नाले आणि नेत्रदीपक धबधबे दिसत होते. त्याच प्रमाणे प्रचंड झाडेझुडपे, वेली, क्षितिजा पर्यंत पसरलेली जंगले, आणि त्या जंगलात साम्राज्य गाजवणारी अनेक जंगली जनावरे. बळी तो कान पिळी, ह्या तत्वाने जगणारे पशु, काळपा काळपाने आनंद घेताना दिसत होती.
[…]
शरीर रचनेचा अभ्यास करताना बऱ्याच गोष्टी खूप मजेदार आणि ज्ञान देणाऱ्या वाटल्या. ह्या जगांत अनेक घटना घडत असतात. त्या स्थिर वा हलचालीयुक्त दिसून येतात. आपल्या शरीरांत देखील तशाच गोष्टी होत असतात. कदाचित् त्याचे रंग रुप वेगळे असतील. परंतु जगातील घडणाऱ्या आणि देहामध्ये घडणाऱ्या घटनामध्ये परिणामाच्या दृष्टीने विलक्षण साम्य असते.
[…]
सर्वत्र पसरलेला गर्द काळोख, भूख, आत्महत्या, भ्रष्टाचार, महागाई इत्यादी आसुरी शक्ती प्रबळ झालेल्या आहे तरीही एक पणती …..
[…]
मर्ढेकरांच्या कवितांत प्रतिमांचा वापर मुक्तपणे केलेला आहे. किंबहुना कवितेत प्रतिमांचा वापर ही मर्ढेकरांची मराठी काव्याला देणगी आहे. “पंक्चरली जरि रात्र दिव्यांनी ” ही कविता तशी दुर्बोधच मानली जाते. मर्ढेकरांच्या अशा कवितांची त्या काळात टीकाकार व समीक्षकांकडून खिल्ली उडवण्यात आली होती. व काही कवितांवर अश्लीलतेच्या नावाखाली खटली भरण्यात आला होता. ह्या संदर्भात कवितेतील प्रतिमांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे.
[…]
हजारो पोलिसांना गडचिरोलीच्या जंगलात तैनात करूनही नक्षल्यांची ताकद कमी का होत नाही, या प्रश्नाचे उत्तर सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणातही शोधणे गरजेचे आहे. थोडक्यात सांगायचे तर अतिरेकी आणि नक्षल्यांच्या नावाखाली कुणाचे काही भले झाले असेल तर ते पोलिसात किंवा अन्य सुरक्षा यंत्रणेत दाखल झालेल्या बेरोजगार तरुणांचे, सुरक्षेची विविध साधने पुरविणाऱ्या कंपन्यांचे, वाहन उद्योगाचे आणि शस्त्रास्त्रे उत्पादन करणार्या कंपन्यांचे भले झाले आहे. बाकी सगळ्या समस्या जिथल्या तिथे आहेत.
[…]
तोरईचे सूप! आश्चर्य वाटेल. पण ग्रीन सूप या नावाने हे सूप पिण्या साठी मुलांना दिले त्यांना अत्यंत आवडले. हे सूप तोरईचे आहे हे कळल्यावर आश्चर्याचा धक्का बसला. कधीही तोरई न खाणारे तोरईची भाजीही आनंदाने खाऊ लागतील तर त्यात नवल नाही.
[…]
कोरा कागदात लक्ष्मी असते तो बाजारात विकला जातो , पण शाई लागलेला कागदात सरस्वती उतरते, तिची कीमत काय बाजारात….
[…]
आज गुजरात एक प्रगत राज्य म्हणविले जाते; कारण तिथला शेतकरी समृद्ध झाला आहे. गुजरातमध्ये भारनियमन नाही, शेतीसाठी भरपूर पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाला उचित दाम मिळण्याची काळजी तिथले सरकार घेते, शासन आणि प्रशासन स्तरावर भ्रष्टाचार अगदी नसल्यातच जमा आहे. गुजरात सरकारने शेतकऱ्यांना जोडधंदे उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. त्याचाही परिणाम शेतकर्यांच्या उन्नतीवर झाला आहे. हे आपल्याकडे का होऊ शकत नाही?
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions