नवीन लेखन...

वाचवा रें वाचवा ….!!!!! या आण्णा पासुन…… भारत सरकारचा टाहो.

राळेगणसिद्धीचे समाजसेवक अण्णा हजारे आतां सगळ्या देशाचे गांधीवादी युगपुरुष झाले आहेत . ते भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहेत आणि त्यांचा लढा आता सगळ्या देशाचा झालाआहे.
[…]

एक मुलगी

एक मुलगी

एक मुलगी चालते आहे आपला रस्ता

खोल शांतशा डोहातील ती तरंग नुक्ता

जंतर मंतर जादू तंतर नाही तिला ठाव

तिचे तिला ठावूक आहे आपले कुठले गाव

होऊन अधीर वाऱ्यासोबत ती भांडत बसते

आपले खेळ ती ताऱ्यासोबत मांडत असते
[…]

प्रथम ट्रस्ट, अलिबाग

अलिबागमधील प्रथम ट्रस्टने अशाच काही अभ्यासात मागे पडलेल्या मुलांना केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रथम आणण्याचा जणु विडाच उचलला आहे. अभ्यासाव्यतिरिक्त मुलांमधील अनेक पैलु हेरुन, त्यांच्यामधील जिद्दीला व आत्मविश्वासाला नवसंजीवनी देण्याचे महान कार्य ‘प्रथम’ अनेक वर्षांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये करत आहे. […]

ऋणानुबंध

ठाऊक नव्हते कालपावतो

नांव तुझे आणि गांवही

क्षणांत जुळले अचानक परि

नाते आपुले जीवनप्रवाही
[…]

नेत्याने अपयशावर कशी मात करावयाची?

श्री. कलाम म्हणतात, त्या दिवशी त्यांनी आपल्या आयुष्यातील एक मोठा धडा घेतला. ज्यावेळेस अपयश आले त्यावेळेस संस्थेचा अध्यक्ष म्हणून अध्यक्षांनी ते आपल्या शिरावर घेतले. परंतु ज्यावेळेस, यश पदरात पडले त्यावेळेस ते त्यांनी ते न घेता आपल्या संपूर्ण गटाला दिले. यावरून हे दिसून येते की, व्यवस्थापनाचे धडे हे पुस्तकात वाचून मिळत नसतात, तर ते अनुभवातून येत असतात.
[…]

येथे तिरंगा विकला जातो

नेटवरुन येणारे अनेक फॉरवर्डस कोण लिहितं, कुठून येतात माहित नाही. मात्र ते इतके छान असतात की त्यांना इतरांपर्यंत पोहोचवण्याचा मोह आवरत नाही.
[…]

भारतीय नागरिक नसताना कसाब न्यायालयात जातोस कसा?

भारतात न्यायव्यवस्था आहे, या व्यवस्थेत प्रत्येक आरोपीला आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याची पूर्ण संधी दिली जाते; परंतु ती सुविधा केवळ भारतीय नागरिकांसाठी आहे, हे या दहशतवाद्यांना सांगायचे असेल तर पकडलेल्या दोन-चार दहशतवाद्यांना गोळ्या घालणे गरजेचे आहे. इथे देशद्रोह्याला चिरडलेच जाते, हा देश स्वाभिमान आणि सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करायला तयार नाही, असा संदेश जोपर्यंत दहशतवाद्यांपर्यंत पोहचत नाही तोपर्यंत इथल्या दहशतवादी कारवायांना लगाम बसणार नाही आणि तोपर्यंत आमच्या स्वातंत्र्यालाही पूर्णत्व येणार नाही. भीत-भीत जगायला लावणारे हे स्वातंत्र्य काय कामाचे?
[…]

राजा आणि त्याचे पाळीव कुत्रे

दरबारात कुत्रे नुसते भुंकायचे नाही तर कधी कधी साखळी तोडून मंत्री आणि सरदाराना चावायला कमी करायचे नाही. पण यात कुत्र्यांची काहीच चुकी नव्हती. कुत्रे म्हणजे एकनिष्ठ आणि आज्ञाकारी. आपल्या दिव्यचक्षुंनी घोटाळेबाज मंत्री आणि सरदाराना ओळखून राजाला सावध करण्यासाठी ते मंत्र्यांवर भुंकायचे. पण त्यांस काय माहित, अधिकांश घोटाळ्यामागे राजाचे आणि राणीचे नातलग असल्यामुळे, राजाला माहित असूनही राजा दुर्लक्ष करायचा. पण कुत्र्यांच्या ह्या भुंकण्यामुळे, मंत्री आणि सरदार घाबरायचे त्या मुळे राजसभेचे कामकाज नेहमीच अर्धवट राहायचे. आणि एक दिवस तर कहरच झाला, कुत्रे शयनग्रहात चक्क ‘राणी’ वर भुंकले……
[…]

स्त्री मुक्तीचा खरा अर्थ – ’’आर्थिक स्वावलंबन‘‘

एवढी प्रचंड स्त्रीची ओळख असतांनाही अजूनही स्त्री जन्मा हीच तूझी कहानी ह्वदयी अमृत नयनी पाणी या विचाराप्रमाणे जिवन जगत आहे. प्रत्येक स्त्री ही राणी लक्ष्मीबाई आहे. परंतु आजचे दुष्य बघीतले तर तीची दषा लग्नापुर्वी ’राणी‘ लग्नानंतर ’लक्ष्मी‘ आणि मुल झाली की ’बाई‘ अशी झाली आहे. भारतीय स्त्रीचे जीवन यमुनेच्या प्रवाहाप्रमाणे संथ वाहत आहे.
[…]

मृत्युची चाहूल

अनेक गंभीर व असाध्य आजार असलेल्या रोग्यांना मृत्युशयेवर असताना त्यांच्या शारीरिक व्याधी तपासण्याचा योग येत असे. तशीच त्यांची त्याक्षणाची मानसिकता समजण्याचे बरेच प्रसंग आले. एक वैद्यकीय अभ्यासक म्हणून स्वानुभवाने त्यांच्याकडे लक्ष्य केंद्रीत करीत होतो. व्यक्ती मृत्युची चाहूल लागताना, कोणते विचार करीते.? कसे वागते ? हे गंभीरपणे बघू लागलो. त्यावर लिखाण केले. अनेक रोग्यांकडे त्या दृष्टीकोणातून अभ्यास करीत गेलो. मृत्यु अचानक येतो. मृत्यु घाला घालतो. मृत्यु अनिश्चीत असतो, परंतु निश्चीत येतो. मृत्यु कोणतीही सुचना न देता येतो. अनेक अनेक ही वाक्ये ऐकतो. ती वाचलेली होती, ऐकलेली होती. कांही व्यक्तींचे मृत्यु जवळून बघण्याचे प्रसंग आले व हाताळले गेले. मृत्यु हे जीवनाचे अंतीम सत्य आहे. त्याला माणसे त्याक्षणी कशी सामोरी जातात, ह्याचे मी सतर्कतेने अवलोकन करुं लागलो. कांही टिपणी केल्या. मात्र काय खरे असेल, ह्यावर वैचारीक साराशं काढणे कठीण गेले.
[…]

1 15 16 17 18 19 72
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..